खुनाच्या तपासासाठी दोन पथके नियुक्त
By Admin | Updated: September 26, 2016 00:10 IST2016-09-25T23:47:33+5:302016-09-26T00:10:15+5:30
चाकूर : अहमदपूर तालुक्यातील तेलगाव येथील एका शेतातील सालगड्यावर प्राणघातक हल्ला करत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पत्नीचे अपहरण करुन निर्घृण खून केला.

खुनाच्या तपासासाठी दोन पथके नियुक्त
चाकूर : अहमदपूर तालुक्यातील तेलगाव येथील एका शेतातील सालगड्यावर प्राणघातक हल्ला करत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पत्नीचे अपहरण करुन निर्घृण खून केला. या प्रकरणातील आरोपींचा दुसऱ्या दिवशीही शोध लागला नाही. तपासासाठी चाकूर पोलिसांनी दोन पथके नियुक्त केले आहेत.
सालगड्याच्या पत्नीचे अपहरण करुन करण्यात आलेल्या निर्घृण खुनाचा तपास पतीच्या जबाबावर अवलंबून आहे. पतीच्या जबाबानंतरच तपासाला गती मिळणार आहे. सध्याला याबाबत काहीच सांगता येणार नाही, असे चाकूर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)