ब्रिजवाडीत दोन गुळगुळीत सिमेंट रस्ते
By Admin | Updated: July 28, 2014 01:02 IST2014-07-28T00:36:21+5:302014-07-28T01:02:58+5:30
औरंगाबाद : वॉर्ड क्र. २२ नारेगाव-ब्रिजवाडीत आज सकाळी अत्यंत उत्साही वातावरणात दोन सिमेंट रस्त्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
ब्रिजवाडीत दोन गुळगुळीत सिमेंट रस्ते
औरंगाबाद : वॉर्ड क्र. २२ नारेगाव-ब्रिजवाडीत आज सकाळी अत्यंत उत्साही वातावरणात दोन सिमेंट रस्त्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व औरंगाबाद पूर्वचे आमदार राजेंद्र दर्डा यांच्या प्रयत्नाने विशेष निधीतून रस्त्यांची ही कामे घेण्यात आली.
रस्ता होण्यापूर्वी याठिकाणी अत्यंत भयानक परिस्थिती होती. पायी चालणे अवघड व्हायचे. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरलेले असायचे. अपघातांना निमंत्रण मिळायचे. स्थानिक नागरिकांनी या प्रश्नाकडे राजेंद्र दर्डा यांचे लक्ष वेधले आणि दिलेला शब्द पाळून हे सिमेंट रस्ते करून दिले. याचा विशेष आनंद नागरिकांनी व्यक्त केला. विशेषत: महिलांनी याबद्दल गौरवोद्गार काढले.
कृउबाचे माजी सभापती पंकज फुलपगर, माजी नगरसेवक दामूअण्णा शिंदे, संतोष लखोटिया, बबन डिडोरे पाटील, कादर शहा, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य अशोक डोळस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या लोकार्पण सोहळ्यास ब्रिजवाडी आणि नारेगाव येथील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. फटाक्यांच्या आतषबाजीत पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ब्रिजवाडी येथील छोटे हेडगेवार रुग्णालय- संजय ढगे यांच्या घरापासून ते गणेश बोर्डे यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे उद्घाटन माजी नगरसेवक भगवान रगडे यांच्या हस्ते करण्यात आले, तर ब्रिजवाडी येथील गल्ली नं.१ काशीनाथ नरवडे यांच्या घरापासून ते रामराव जाधव यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे उद्घाटन काशीनाथ नरवडे यांच्या हस्ते करण्यात आले. बुद्धविहारासमोर झालेल्या सभेत डिडोरे, रगडे, डोळस, दामूअण्णा यांची भाषणे झाली. सुभाष हिवराळे यांनी सूत्रसंचालन केले. ‘राजेंद्र दर्डा यांच्या प्रयत्नाने विकासाच्या गंगेचे पाणी नक्कीच ब्रिजवाडी- नारेगाव परिसरात खळाळत आहे. यापूर्वी कोणत्या खासदाराचा अन् आमदाराचा निधी इकडे कधी आला नव्हता; परंतु गरिबांची जाण असलेले राजेंद्र दर्डा यांनी जाणीवपूर्वक अनेक विकासकामे करून या भागाचा कायापालट करून दाखवला आहे’ अशी प्रतिक्रिया आपल्या भाषणातून भगवान रगडे- सुभाष हिवराळे यांनी व्यक्त केली. यावेळी सा.बां. चे. उपअभियंता ए.डी. घेवारे, शाखा अभियंता एस.एस. भोसले तसेच अण्णासाहेब पाखरे, आनंद लोखंडे, रेखा देशमुख, पुंडलिक हिवराळे, संजय पट्टेकर, साहेबराव नन्नावरे, परमेश्वर सुरडकर, रमाबाई काळे, प्रगती देशमुख, लता खंडागळे, शारदा चिपडू, अरुणा वाघमारे, पंकज देशमुख, अनिल बोर्डे, भीमराव घोरपडे, नागेश आठवले, सुमन ढेपे, माया हिवराळे, मंदा जाधव, विजया भोळे आदींची या कार्यक्रमास उपस्थिती होती.
शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या विशेष निधीतून ब्रिजवाडीत तयार करण्यात आलेल्या दोन सिमेंट रस्त्यांच्या लोकार्पणप्रसंगी पंकज फुलपगर, भगवान रगडे, बबन डिडोरे, दामूअण्णा शिंदे, सुभाष हिवराळे, कादर शहा, अशोक डोळस, संतोष लखोटिया, कुंडलिक हिवराळे, सुमनबाई ढेपे, कांता सोनवणे, मंदाबाई जाधव, मायादेवी हिवराळे, रेखा देशमुख, रमाबाई काळे आदी उपस्थित होते.