हिंगोलीत दोन दुकाने जळाली
By Admin | Updated: September 27, 2014 00:54 IST2014-09-27T00:26:59+5:302014-09-27T00:54:24+5:30
हिंगोली : शहरातील गांधी चौक परिसरातील फुलमंडी भागातील दोन दुकानांना आग लागल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली

हिंगोलीत दोन दुकाने जळाली
हिंगोली : शहरातील गांधी चौक परिसरातील फुलमंडी भागातील दोन दुकानांना आग लागल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. यात दुकानातील साहित्य व फर्निचर जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
विजयकुमार रमाकांत गुंडेवार यांच्या किराणा दुकानास आग लागून ६५ हजारांचे नुकसान झाले. तसेच राजाराम सुधाकर गंधेवार यांचे अंदाजे अडीच लाखांचे नुकसान झाले. दरम्यान, नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आल्यानंतर आग विझली. मात्र तोपर्यंत शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीशकुमार टाक यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विवेक सोनवणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याबाबत व्यापाऱ्यांनी हिंगोली शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. (प्रतिनिधी)