त्रिमूर्तीनगरात दोन दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:17 IST2017-11-03T00:17:21+5:302017-11-03T00:17:29+5:30
शहरातील त्रिमूर्तीनगरमध्ये दोन दुकानांचे शटर वाकवून चोरी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे.

त्रिमूर्तीनगरात दोन दुकाने फोडली
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील त्रिमूर्तीनगरमध्ये दोन दुकानांचे शटर वाकवून चोरी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
येथील त्रिमूर्तीनगर भागात अशोक अमरचंद जैन यांचे किराणा दुकान आहे. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करण्यात आले. त्याच रात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आतमध्ये प्रवेश करीत गल्ल्यातील नगदी ६ हजार रुपये घेऊन पोबारा केला.
याच भागात पोलीस मुख्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेले अनिल कुंडलिकराव भोसले यांच्या किराणा दुकानाचे शटरही चोरट्यांनी वाकविले असून दुकानातील ५ हजार रुपये घेऊन पोबारा केला.
एकाच दिवशी दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, दोन्ही दुकानदारांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. परंतु, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.