महामार्गावरील दोन दुकाने फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

By Admin | Updated: May 16, 2014 00:12 IST2014-05-15T23:21:28+5:302014-05-16T00:12:47+5:30

जालना : औरंगाबाद-जालना महामार्गावरील फैसल टॉवर या संकुलातील दोन दुकाने फोडून चोरट्यांनी सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास केला.

Two shops on the highway and one half lankara lumpa break | महामार्गावरील दोन दुकाने फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

महामार्गावरील दोन दुकाने फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

 जालना : औरंगाबाद-जालना महामार्गावरील फैसल टॉवर या संकुलातील दोन दुकाने फोडून चोरट्यांनी सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली. शहरातील औद्योगिक वसाहतीच्या समोरील बाजूस फैसल टॉवर आहे. या संकुलात जगदंबे किराणा दुकान व एका ट्रॅक्टर एजन्सीचे शो-रुम आहे. पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी या दोन्ही दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. शो-रुममधील रोख ६३ हजार तसेच इतर सामान असा सुमारे एक लाखाचा तर किराणा दुकानातील रोख ७ हजार व इतर असा ५० हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. गुरूवारी सकाळी दुकान उघडण्यास आलेल्या विक्रेत्यांना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तालुका जालना पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत या घटनेची नोंद तालुका जालना पोलिस ठाण्यात नव्हती. या प्रकारामुळे व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

Web Title: Two shops on the highway and one half lankara lumpa break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.