लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : तालुक्यातील बाबतरा येथे गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेली दोन शाळकरी मुले पाण्यात बुडाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. विवेक कालीचरण कुमावत (१५) व तुषार सतीश गांगड (१४) अशी त्यांची नावे आहेत.
वीरगाव पोलिसांना ही माहिती कळविण्यात आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, सपोनि. अतुल येरमे यांनी घटनास्थळी भेट देऊन अग्निशमन दलाला पाचारण केले. महसूलच्या अधिकाऱ्यांनीही भेट दिली. दोन बोटींच्या साहाय्याने सकाळपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुलांचा शोध घेण्यात आला; पण मुले न सापडल्याने शोधकार्य थांबवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, एपीआय प्रतापसिंह बहुरे, जि.प. सदस्य पंकज ठोंबरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, पोलीस पाटील नवनाथ गायकवाड, अजय पाटील चिकटगावकर, पंचायत समितीचे उपसभापती प्रभाकर बारसे, रमेश पाटील बोरनारे, केशव मोरे, शिवाजी गंगुले, सरपंच लक्ष्मण मुकिंद, सागर गायकवाड, बाबासाहेब जगताप, दिगंबर तुरकणे, धनंजय धोर्डे, तलाठी राजपूत आदींनी भेट दिली.पुणतांबा शाळेचे विद्यार्थीविवेक व तुषार हे पुणतांबा (जि. अहमदनगर) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात. तुषार हा आठवीचा तर विवेक हा नववीचा विद्यार्थी असून, हे दोघे सार्थक एकनाथ भवर या विद्यार्थ्यासोबत गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेले होते. यापैैकी सार्थक पोहायला गेलाच नव्हता.