शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

छत्रपती संभाजीनगरात पुन्हा करोडोंचे दोन घोटाळे! गुंतवणूकदारांचे पैसे उकळून संचालक पसार

By सुमित डोळे | Updated: October 5, 2023 13:08 IST

रक्कम ६० कोटींच्या पुढे : आभा इन्व्हेस्टमेेंट अँड लँड डेव्हलपर्सच्या संचालकांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : शहरात कोट्यवधींच्या घोटाळ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आदर्श, देवाई महिला नागरी सहकारी पतसंस्थेनंतर आता आभा इन्व्हेस्टमेंट अँड लँड डेव्हलपर्सचे संचालक शेकडो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये उकळून पसार झाले आहेत. चिकलठाणा एमआयडीसीतील अलिशान कार्यालयाला अचानक कुलूप दिसल्यानंतर या गुंतवणूकदारांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक तपास करून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात पंकज शिवाजी चंदनशिव, त्याची पत्नी प्रियंका (रा. जयभवानीनगर), शिवाजी रोडे (रा. हर्सूल सावंगी), सोमीनाथ चंदनशिव, सोमीनाथ नरवडे यांच्यावर बुधवारी गुन्हा दाखल केला.

ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रवी वीर यांना २०२२ मध्ये रोडे यांच्यामार्फत चंदनशिवच्या फर्मविषयी माहिती मिळाली. चंदनशिव शेअर्स ट्रेडिंग फॉरेक्स क्रिप्टो करन्सी कमोडिटिज ट्रेडिंगचा व्यवसाय करत होता. गुंतवणुकीवर महिना ७ टक्के परतावा देण्याची हमी देतो, असेही रोडेने वीर यांना सांगितले. ऑगस्ट २०२२ मध्ये चिकलठाणा एमआयडीसीमधील गोल्डन सिटी सेंटरमधील कार्यालयात त्यांची पहिली भेट झाली. विश्वास वाटून वीर यांनी २ लाखांची गुंतवणूक केली. त्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये अडीच लाख, जानेवारी २०२३ मध्ये ३ लाखांची गुंतवणूक केली. चंदनशिवने जुलै २०२३ पर्यंत परतावा देऊन त्यानंतर परतावा देणे बंद केले. वीर यांनी पैशांची मागणी सुरू केल्यावर चंदनशिवने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले आहेत, सप्टेंबरमध्ये देताे, असे सांगून वेळ मारून नेली.

शेकडो गुंतवणूकदार, सर्व सुशिक्षितसहायक आयुक्त धनंजय पाटील, निरीक्षक संभाजी पवार यांनी प्राथमिक तपास केला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक तक्रारीत ५२ गुंतवणूकदारांचा उल्लेख असून, त्याव्यतिरिक्त बुधवारपर्यंत आयुक्तालयात ६० तक्रारी आल्या होत्या. २ कोटी ३० लाखांचा गुन्हा दाखल असून, तक्रारींचा वेग पाहता ६० कोटींच्या पुढे आकडा जाण्याची शक्यता आहे. सहायक आयुक्त धनंजय पाटील अधिक तपास करत आहेत. याच संचालकांनी ज्ञानोबा अर्बन क्रेडिट सोसायटीतदेखील कोट्यवधींचा घोटाळा केला आहे.

बॉण्डवर करार केला अन् कुलूप लावून पळालाचंदनशिवने २०२१ मध्ये या फर्मची स्थापना केली होती. प्रत्येक गुंतवणूकदारासोबत १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर अकरा महिन्यांचे सामंजस्य करार केले, शिवाय व्याज कपातीचे अधिकार स्वत:कडे असतील, वीस दिवसांच्या आत गुंतवणूकदारांना उर्वरित रक्कम दिली जाईल, असेही त्यात नमूद केले. रकमेच्या बदल्यात त्याने काही गुंतवणूकदारांना धनादेशही दिले हाेते. मात्र, काही दिवसांपूर्वी कार्यालयाला कुलूप लावून, मोबाइल बंद करून संचालक पसार झाले.

दुसरा घोटाळा अधानेच्या संस्थेतआदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत २०२ कोटींच्या घोटाळ्याच्या प्रमुख आरोपींपैकी एक देविदास अधाने याने स्वत:च्याही संस्था स्थापन केल्या होत्या. त्यापैकी यशस्विनी या संस्थेत जवळपास २८ कोटींचा घोटाळा झाल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात निदर्शनास आले आहे. अधाने दोन महिन्यांपासून पसार असून, त्याची पत्नी हर्सूल कारागृहात आहे. यशस्विनीच्या या घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी सिडको पोलिसांना अहवाल सादर करण्यात आला आहे, तर त्याच्या अन्य संस्थांचीही चौकशी सुरू असून, घोटाळ्याचा आकडा वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी