घरफोडी प्रकरणातील दोघे लातुरातून जेरबंद
By Admin | Updated: July 21, 2016 01:08 IST2016-07-21T00:57:50+5:302016-07-21T01:08:22+5:30
जळकोट : तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील गणेश नगरात राहणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षका सारीका शाहूराज भोसले याचे घर

घरफोडी प्रकरणातील दोघे लातुरातून जेरबंद
जळकोट : तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील गणेश नगरात राहणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षका सारीका शाहूराज भोसले याचे घर भरदिवसा फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी दोघांना लातूर येथून अटक केली.
याबाबत नळदुर्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळकोट येथील शिक्षिका सारीका शाहूराज भोसले या ११ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता घराला कुलूप लावून शाळेत गेल्या होत्या. याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी भरदिवसा घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम, दागिने असा लाखोंचा मुद्देमाल लंपास केला .
याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाची चक्रे फिरविली. या चोरी प्रकरणातील आरोपी जळकोट येथील जयशंकर ढाब्यावर आल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले. या आधारे पोलिसांनी तपास करून लातूर येथून विकास दगडू गारगेवाड (वय २४, रा. सिध्देश्वरनगर) याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीवरून शुभम सूर्यकांत चिखलीकर (वय १९, रा. लातूर) यालही अटक करण्यात आली. आणखी दोन आरोपींच्या मागावर नळदुर्ग पोलिस असून, लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, अशी माहिती सपोनि रमाकांत पांचाळ यांनी दिली आहे. (वार्ताहर)