शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दोन प्लेटलेटस् वरच मदार

By admin | Updated: June 9, 2015 00:18 IST

बीड : येथील जिल्हा रूग्णालयात ग्रामीण भागातील रूग्णांचा मोठ्या प्रमाणात भार आहे. असे असतानाही येथील रक्तपेढीत एकूण तीन प्लेट लेटस् च्या

बीड : येथील जिल्हा रूग्णालयात ग्रामीण भागातील रूग्णांचा मोठ्या प्रमाणात भार आहे. असे असतानाही येथील रक्तपेढीत एकूण तीन प्लेट लेटस् च्या मशिन असून यापैकी एक मशिन लातूर येथे दुरूस्तीला पाठविली असल्याने केवळ दोनच मशिनवर येथील रूग्णांचा भार आहे. रूग्णांच्या रक्तातील पेशींचे विघटन करण्याची प्रक्रीया करणाऱ्या तीन मशिन जिल्हा रुग्णालयाकडे आहेत. यातील एक मशिन अनेक महिन्यापासून नादुरूस्त असल्याने दुरूस्तीसाठी लातूरला पाठविली आहे. दिवसाकाठी साडेचारशे ते पाचशे रूग्ण उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात येतात. अनेक रुग्णांना प्लेट लेटस् ची आवश्यकता असते. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने व रक्त पेढीत मनुष्य बळ व यंत्र ना दुरूस्तीचा प्रश्न असल्याने जिल्हा रुग्णालयातील रक्त पेढीतील तीन चार कर्मचाऱ्यांना दोन दिवसाआड २४ तास काम करावे लागत आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. उन्हाळ्यात कमी पडू दिला नाही रक्त पुरवठा दरवर्षी उन्हाळ्यात रक्तदान शिबीरे कमी होत असतात. परिणामी रक्त पुरवठाही कमी होतो. यंदा मात्र याहून वेगळी परिस्थिती होती. ब्लड कार्डवर मोफत रक्त देण्याच्या योजनेमुळे उन्हाळ्यातही रक्ताचा तुटवडा जाणवला नाही. जिल्हा रुग्णालयातील रक्त पेढी विभागात मनुष्य बळाचा अभाव असताना देखील कार्यरत असलेले कर्मचारी वेळेपेक्षा जास्त तास काम करत आहेत. (प्रतिनिधी) मागील दीड दोन वर्षापासून येथील डॉ. जयश्री बांगर यांच्याकडे जिल्हा रुग्णालयातील रक्त पेढीची जबाबदारी आहे. मात्र मागील अनेक महिन्यापासून रक्त पिढी प्रमुख पदावर कार्यरत असलेल्या व्यक्ती रजेवर आहेत. शिवाय लॅब इनचार्ज देखील रजेवर असल्याने सर्व भार केवळ डॉ. जयश्री बांगर व त्यांच्या कर्मचाऱ्यावरच असल्याचे सूत्रांनी सांगितले.