ठाण्यात पोलिस व्हॅन जाळल्या प्रकरणी दोघे जण ताब्यात
By Admin | Updated: September 19, 2014 01:00 IST2014-09-19T00:48:44+5:302014-09-19T01:00:40+5:30
लातूर : चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या अन् डिझेल असलेल्या कारमध्ये पार्किंग होवून आग लागली़ या आगीत कारसह एक पोलिस व्हॅन जळून खाक झाली़

ठाण्यात पोलिस व्हॅन जाळल्या प्रकरणी दोघे जण ताब्यात
लातूर : चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या अन् डिझेल असलेल्या कारमध्ये पार्किंग होवून आग लागली़ या आगीत कारसह एक पोलिस व्हॅन जळून खाक झाली़ अन्य तीन वाहनांनाही हाय लागली़ मंगळवारी पहाटे घडलेल्या या घटनेच्या चौकशीसाठी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली़
लातूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आलापूरकर आणि चालक फुलारी हे मंगळवारी पहाटे गस्तीवर होते़ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ड्युटीवर असताना कन्हेरी रोडलगत के़ए़३८ बी-५५६८ क्रमांकाचा ट्रक थांबला होता़ त्या ट्रकच्या बाजूलाच एमएच १५ एबी-१२०० या क्रमांकाची कार व व्यक्ती होत्या़ त्यांना ‘येथे का थांबलात’ असे विचारले असता कारमधील त्या दोघा व्यक्तींनी कारसह पलायन करण्याचा प्रयत्न केला़ त्यांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी गाठले, परंतु, गाडी सोडून पळून जाण्यात ते यशस्वी झाले़ कारचे समोरचे सिट होते़ परंतु, मागचे सिट काढून तिथे १५, २५, ५० लिटरचे डिझेलचे भरलेले कॅन होते़ या कारला टोचण लावून ग्रामीण पोलिस ठाण्यात आणली असता १० ते १५ मिनिटात कारचे टायर जळाले़ कारने अचानक पेट घेतला आणि आतील डिझेलचा स्फोट झाला़ यामध्ये कारच्या बाजूला पार्किंग केलेले पोलिस व्हॅनही जळून खाक झाले़ याप्रकरणी एपीआय सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आकस्मात जळीतची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली़ याप्रकरणी दोन संशयितांना गुरुवारी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे़ सदर प्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू झाली असून, या प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार असल्याचे सांगण्यात आले.(प्रतिनिधी)
लातूर ग्रामीण पोलिसांनी या घटनेतील संशयित म्हणून किरण लोमटे (वय २०, रा. रूईभर, ता.जि. उस्मानाबाद), विनेश काळे (वय ३०, रा. नागलगाव, ता. कळंब) या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्या दोघांवरही चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिस ठाण्यात जाळलेल्या कार व पोलिस व्हॅनच्या नुकसानीबाबतचा अजून कसलीही नोंद नाही.