‘विकास’च्या आखाड्यातून दोन गटांत दोघांची माघार

By Admin | Updated: February 4, 2015 00:41 IST2015-02-04T00:33:35+5:302015-02-04T00:41:30+5:30

लातूर : लातूर तालुक्यातील निवळी येथील विकास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत दोन जणांनी माघार घेतली आहे़

Two out of two groups in 'development' arena retreat | ‘विकास’च्या आखाड्यातून दोन गटांत दोघांची माघार

‘विकास’च्या आखाड्यातून दोन गटांत दोघांची माघार



लातूर : लातूर तालुक्यातील निवळी येथील विकास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत दोन जणांनी माघार घेतली आहे़ बाभळगाव व कासारजवळा गटातील उमेदवारांचा यात समावेश आहे़ लातूर ग्रामीणमध्ये वर्चस्व असलेल्या भाजपाने पहिल्यांदाच ‘विकास’च्या फडात उमेदवार उभे केले आहेत़ मांजरा पट्ट्यातील भाजपाचे स्थानिक नेते निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत़
१७ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत यापूर्वीच कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ़ अमित देशमुख व बोरगाव काळे येथील भारत आदमाने हे दोघे बिनविरोध आले आहेत़ त्यामुळे १५ जागांसाठी निवडणूक होणार आहे़ १२ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज माघार घेण्याची मुदत आहे़ मंगळवारपर्यंत दोघांनी माघार घेतली आहे़ बाभळगाव गटातील ज्ञानोबा निवृत्ती कांबळे व कासारजवळा गटातून सौदागर पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली़ १५ जागेसाठी काँग्रेस व भारतीय जनता पार्टीत लढत होण्याची शक्यता बळावली आहे़
विकास कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपाचे कार्यकर्ते पुन्हा आमनेसामने येत आहेत़ उमेदवारांनी सभासदांच्या गाठीभेटी सुरू आहेत़ १२ फेब्रुवारीपर्यंत नेमके काय चित्र स्पष्ट होईल,

Web Title: Two out of two groups in 'development' arena retreat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.