आणखी दोन हॉटेल चालकांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: December 27, 2016 00:03 IST2016-12-26T23:59:16+5:302016-12-27T00:03:47+5:30
बीड : परप्रांतियांना बेकायदेशीररीत्या आश्रय देणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे सत्र सुरूच असून, सोमवारी आणखी दोन हॉटेलचालकावर दिंद्रूड (ता. माजलगाव) येथे कारवाई करण्यात आली.

आणखी दोन हॉटेल चालकांवर गुन्हा दाखल
बीड : परप्रांतियांना बेकायदेशीररीत्या आश्रय देणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे सत्र सुरूच असून, सोमवारी आणखी दोन हॉटेलचालकावर दिंद्रूड (ता. माजलगाव) येथे कारवाई करण्यात आली.
तेलगाव रस्त्यावरील कन्हैयालाल शंकर मेहता यांच्या हॉटेलात तीन परप्रांतीय कामगार आढळून आले. त्यांची माहिती पोलिसांना न दिल्यावरून दहशतवादविरोधी पथकाचे वसुदेव मिसाळ यांनी त्यांच्या विरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून दिंद्रूड ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
दुसरी कारवाई पो.हे.कॉ. रविभूषण जाधवर यांनी केली. तेलगाव येथील बन्सीलाल भीमशंकर मेहता यांच्या हॉटेलात दोन परप्रांतीय कामगार आढळून आले. याचीही दिंद्रूड ठाण्यात फिर्याद दाखल आहे.
दोन्हीही प्रकरणांचा तपास पो.हे.कॉ. एस.बी. चौरे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)