परळीत बँकेच्या रांगेत दोन वृद्धांना भोवळ
By Admin | Updated: November 4, 2016 00:08 IST2016-11-04T00:04:41+5:302016-11-04T00:08:39+5:30
परळी : येथील हैदराबाद बँकेत ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड होत असून, गुरुवारी रांगेतील दोघांना भोवळ आल्याने ते जमिनीवर कोसळले.

परळीत बँकेच्या रांगेत दोन वृद्धांना भोवळ
परळी : येथील हैदराबाद बँकेत ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड होत असून, गुरुवारी रांगेतील दोघांना भोवळ आल्याने ते जमिनीवर कोसळले.
शहरातील हैदराबाद बँकेच्या मोंढा शाखेत हा प्रकार घडला. बँकेत वृद्धांसाठी कुठल्याही सुविधा नाहीत. त्यांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. गुरुवारी लागोपाठ दोन ज्येष्ठ नागरिक उन्हामुळे रांगेतच भोवळ येऊन पडले. सामाजिक कार्यकर्ते प्रा. अतुल दुबे यांनी त्यांना दवाखान्यात नेऊन उपचार केले. दरम्यान, वृद्धांसाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून त्यांची हेळसांड थांबवावी, अशी मागणी दुबे यांनी केली आहे. आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. (वार्ताहर)