दोन नायजेरियन भामटे अखेर गजाआड

By Admin | Updated: June 28, 2016 00:58 IST2016-06-28T00:44:24+5:302016-06-28T00:58:52+5:30

औरंगाबाद : तुम्हाला लॉटरी लागली आहे, तुमचे एटीएम बंद करण्यात आले आहे, विदेशात मोठ्या पगाराची नोकरी लावतो, असे विविध प्रकारचे आॅनलाईन

Two Nigerian villains finally go missing | दोन नायजेरियन भामटे अखेर गजाआड

दोन नायजेरियन भामटे अखेर गजाआड


औरंगाबाद : तुम्हाला लॉटरी लागली आहे, तुमचे एटीएम बंद करण्यात आले आहे, विदेशात मोठ्या पगाराची नोकरी लावतो, असे विविध प्रकारचे आॅनलाईन आमिष दाखवून आतापर्यंत अनेक जण गंडविल्या गेले आहेत; परंतु हे भामटे देशभरातील पोलिसांच्या काही हाती लागत नसत. औरंगाबाद पोलिसांनी मात्र, अशीच आॅनलाईन भामटेगिरी करणाऱ्या दोन नायजेरिन ठगांना मोठ्या शिताफीने दिल्लीत जाऊन अटक करण्याची किमया साध्य केली आहे. या भामट्यांनी औरंगाबादेतील एका उच्चशिक्षित महिलेला तब्बल १५ लाख रुपयांचा गंडा घातला होता.
उजेह आॅगस्टीन उगो चिक्वू आणि चुक्वीक जॉर्ज (हल्ली मुक्काम दिल्ली) अशी नायजेरियन भामट्यांची नावे आहेत. या कारवाईबाबत माहिती देताना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले की, समर्थनगर येथील रहिवासी संपदा (नाव बदलले आहे) या ४८ वर्षीय महिलेचे फेसबुक अकाऊंट आहे. इंग्रजी साहित्य विषयात त्या डॉक्टरेट आहेत. फेसबुकवरील त्यांच्या अकाऊंटवरील त्यांचा मोबाईल नंबर मिळवून १५ एप्रिल रोजी त्यांना जेम्स ड्युक नावाच्या भामट्याने त्यांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर संभाषण केले. त्यावेळी त्याने स्वत:ची मरीन टूर्स नावाची ट्रॅव्हल्स एजन्सी आणि वर्ल्ड क्लास वाईल्डलाईफ अ‍ॅण्ड ग्लेसिअर क्रुईसेस ही शिपिंग कंपनी असल्याचे सांगितले. या कंपनीला दिल्ली येथे कार्यालय सुरू करावयाचे आहे. त्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या महिलेची आम्हाला कार्यालय प्रमुख म्हणून नियुक्ती करावयाची असल्याचे सांगितले. संपदा यांनी तेथे नोकरी करण्याची तयारी दर्शविली. तेव्हा त्याने तुमच्या नावाने मलेशिया येथून एक पार्सल पाठवीत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना मलेशिया येथून एका व्यक्तीने फोन करून सांगितले की, तुमच्या नावाने एक पार्सल पाठविण्यात आले आहे. त्या पार्सलमध्ये अडीच लाख अमेरिकन डॉलर, सोन्याची साखळी आणि अ‍ॅपल कंपनीचा मोबाईल आणि इतर गॅजेटस् असल्याचे त्यांना सांगितले.
त्यानंतर या भामट्याने पुन्हा त्यांना फोन करून एवढ्या (पान २ वर)
भामट्याने पंधरा लाख रुपये उकळले. नंतर आणखी तेवढीच रक्कम मागितली. त्यानंतर संपदा यांनी १७ जून रोजी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती दिली.
४ही शुद्ध फसवणूक असल्याचे पोलीस आयुक्तांच्या लक्षात आले. त्यांनी प्रथम क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेऊन पोलीस निरीक्षक नागनाथ कोडे यांच्याकडे तपास सोपविला.
दिल्लीतील छतरपूर भागातील हॉटेल्स होडल्स येथे नायजेरियन नागरिकांची २४ जूनच्या रात्री पार्टी होती. या पार्टीला दोन्ही भामटे उपस्थित असल्याचे फौजदार वाघ आणि कुरुंदकर यांना समजले. त्यानंतर त्यांनी दिल्ली पोलिसांचे एक पथक सोबत घेऊन आरोपींना पकडण्यासाठी हॉटेलबाहेर सापळा रचला.
४रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दोन्ही भामटे हॉटेलमधून बाहेर पडले आणि रिक्षात बसले. त्यावेळी फौजदार वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर झडप घातली. यावेळी उजेह आॅगस्टीन हा पळून जाऊ लागला. वाघ यांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडले. वाघ यांनी त्यांच्याकडील पिस्तूल आरोपीच्या कानावर रोखले तेव्हा तो शांत झाला आणि चुक्वीक जॉर्ज याने पोलिसांचा रुद्रावतार पाहून शरणागती पत्करली.

Web Title: Two Nigerian villains finally go missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.