जिल्ह्यात दोन खून
By Admin | Updated: September 6, 2014 00:28 IST2014-09-06T00:21:57+5:302014-09-06T00:28:26+5:30
नवीन नांदेड/कंधार : नांदेड ग्रामीण आणि कंधार पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या परिसरात खुनाची प्रत्येकी एक घटना गुरुवारी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जिल्ह्यात दोन खून
नवीन नांदेड/कंधार : नांदेड ग्रामीण आणि कंधार पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या परिसरात खुनाची प्रत्येकी एक घटना गुरुवारी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दैधना ता. कंधार येथील आरोपी ज्ञानोबा यशवंत आनकाडे, रंजना ज्ञानोबा आनकाडे यांनी संगनमत करुन १७ गुंटे जमीन नावावर करुन देण्याच्या कारणावरुन मयत प्रभाकर आनकाडे (वय ४०) यांना दगडाने व चाकूने मारहाण केली. मारहाणीत प्रभाकर आनकाडे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मीराबाई आनकाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कंधार पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला. तपास पोलिस निरीक्षक सुडके करीत आहेत.
दरम्यान, नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या नावघाट पुलाजवळ खुनाची दुसरी घटना घडली. स.मलंग ऊर्फ मुन्नी स. हसन (रा. मुजामपेठ) असे मयताचे नाव आहे. अज्ञात आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने मयताच्या डोक्याच्या बाजूस वार केले. याप्रकरणी स. अय्युब स. मलंग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. (वार्ताहर)
वीज मदतीसाचा मृत्यू; दोघांविरुद्ध गुन्हा
मुदखेड-मेंडका जाणाऱ्या रस्त्यावर पीरसाब यांच्या घरासमोरील वीज खांबावर मयत सतीश सोनकांबळे १ सप्टेंबर रोजी सकाळी काम करीत होते, यात विजेच्या तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार धरुन मुदखेड पोलिसांनी मौजम मुस्तफा व अन्य एकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. या प्रकरणाची फिर्याद जिजाबाई सोनकांबळे यांनी पोलिसांत दिली होती.