औरंगाबादेत माथेफिरूने जाळल्या आणखी दोन दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:17 IST2017-09-15T01:17:26+5:302017-09-15T01:17:26+5:30
काजीवाडा येथे समाजकंटकाने पुन्हा दोन दुचाकी जाळल्या. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली

औरंगाबादेत माथेफिरूने जाळल्या आणखी दोन दुचाकी
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जुनाबाजार येथे पूर्ववैमनस्यातून वाहने जाळणाºयाला घटनेनंतर अवघ्या काही तासांत गुन्हेशाखेने अटक केल्याची घटना ताजी असतानाच शहरातील काजीवाडा येथे समाजकंटकाने पुन्हा दोन दुचाकी जाळल्या. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, काजीवाडा येथील रहिवासी नीलेश रत्नाकर घुले यांनी बुधवारी रात्री घरासमोर त्यांची मोटारसायकल (एमएच-२० एव्ही ८४४४) उभी केली होती. शेजारीच तौसिफ शेख यांची मोटारसायकल (एमएच-२० बी डब्ल्यू ८८६९) उभी होती. मध्यरात्री कोणीतरी प्रथम नीलेश यांची आणि नंतर तौसिफची दुचाकी पेटविली. या घटनेत नीलेश यांच्या दुचाकीची सीट आणि इंजिनने पेट घेतला. धुराने नीलेशसह शेजाºयांना जाग आली. त्यांनी पाणी मारून आग विझविली. या घटनेत नीलेशची दुचाकी खाक झाली, तर तौसिफ यांच्या दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले. माहिती मिळताच सिटीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत कदम आणि कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. नीलेश यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. या गाड्या कोणी आणि का पेटविल्या याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला.