शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

लड्डा दरोडा प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक, ८ लाख रुपये जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 14:16 IST

उद्योजकाच्या घरावरील दरोडा प्रकरण, आरोपींमध्ये बाप-लेकीचा समावेश

छत्रपती संभाजीनगर : बजाज नगरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणात गुन्हे शाखेने यापूर्वी अटक केलेल्या आरोपीची पत्नी आणि सासऱ्याला अटक केली. या दोघांकडून गुन्ह्यातील सोने विकून आणलेले ८ लाख रुपये रोख आणि १० हजार रुपयांचा मोबाईल जप्त केला. आरोपी सासऱ्याला न्यायालयाने ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली तर पत्नीची प्रकृती खालावल्यामुळे घाटी रुग्णालयात दाखल केले.

पोलिस कोठडीतील आराेपी सुरेश ऊर्फ सूर्यकांत गंगणे याची पत्नी बबिता गंगणे (रा. कुत्तर विहीर, अंबाजोगाई, जि. बीड) व सासरा भारत नरहरी कांबळे (रा. मोटेगाव, ता. रेणापूर, जि. लातूर) अशी नव्याने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर सहा जणांनी दरोडा टाकून साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी, ७० हजार रुपये रोकड असा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गुरमे तपास करत आहेत. दरोड्याचा मुख्य सूत्रधार अमोल खोतकरचे साथीदार सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे, सय्यद अजहरोद्दीन कबीरोद्दीन, सोहेल जलील, महेंद्र बिडवे व योगेश हजबे यांना गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यात अमोल खोतकर याचा एन्काऊंटर झाला.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी आणखीन पाच जणांना अटक केली. त्यात सिडको वाळूज महानगर, वडगाव कोल्हाटी येथील आरोपींचा समावेश होता. या दरोड्यात सहभागी बीड येथील सुरेश ऊर्फ सूर्यकांत गंगणे याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी त्याची पत्नी बबिता, सासरा भारत कांबळे यांना अटक केली. बबिताच्या ताब्यातून ३ लाख तर भारतच्या ताब्यातून ५ लाख अशी एकूण ८ लाख रुपयांची रोकड व १० हजार रुपयांचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.

३ जूनपर्यंत पोलिस कोठडीपोलिसांनी आरोपी भारत कांबळे याला रविवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. बेदरकर यांनी दिले. तर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या बबिता सुरेश गंगणे हिची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी निरीक्षक संदीप गुरमे यांनी न्यायालयात अर्जाद्वारे सादर केली. या प्रकरणात सरकारी वकील विशाल साक्री यांनी काम पाहिले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी