शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

औरंगाबादेत ६० लाख किमतीचे दोन मांडूळ केले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:13 AM

गुप्तधनासाठी मांत्रिकांकडून काळ्या बाजारात सोन्याचा भाव असलेले दोन मांडूळ गुन्हे शाखा पोलिसांनी वाळूज एमआयडीसी परिसरातील पंढरपूर येथे एका खोलीत छापा मारून जप्त केले. याप्रकरणी दोन तस्करांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देछापा : वाळूज एमआयडीसी परिसरात रात्री कारवाई; दोन तस्कर अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गुप्तधनासाठी मांत्रिकांकडून काळ्या बाजारात सोन्याचा भाव असलेले दोन मांडूळ गुन्हे शाखा पोलिसांनी वाळूज एमआयडीसी परिसरातील पंढरपूर येथे एका खोलीत छापा मारून जप्त केले. याप्रकरणी दोन तस्करांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दीपक सोमीनाथ मोरे (४०,रा. वडगाव) आणि सुनील वाडीलाल चव्हाण (२८,रा. वडगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे म्हणाले की, जादूटोणा करून गुप्तधन शोधण्यासाठी मांत्रिक मंडळी मांडुळाचा वापर करतात, अशा मांत्रिकांकडून मांडुळाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.मांडुळाच्या वजनानुसार मांडुळाचा दर काळ्या बाजारात ठरतो. यामुळे काही लोक मांडुळाची विक्री करीत असतात. वाळूज एमआयडीसी परिसरातील पंढरपूर येथील एका वीटभट्टीजवळ राहणाºया दोन जणांकडे मांडूळ असून ते दोन्ही मांडूळ विक्रीसाठी मुंबईला घेऊन जाणार असल्याची माहिती खबºयाने गुन्हेशाखा पोलिसांना दिली. माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, सुधाकर राठोड, नवाब शेख, योगेश गुप्ता, लालखॉ पठाण, नंदलाल चव्हाण, सिद्धार्थ थोरात, धर्मराज गायकवाड, नितीन धुळे यांनी १६ फेबु्रवारी रोजी रात्री साडेसातच्या सुमारास संशयितांच्या घरांवर छापे मारले. यावेळी दीपकच्या खोलीत चॉकलेटी रंगाचे ३ फूट लांबीचे आणि ४ किलो वजनाचे मांडूळ मिळाले, तर आरोपी सुनीलच्या खोलीत दीड फूट लांबीचे आणि एक किलो वजनाचे चॉकलेटी रंगाचे दुसरे मांडूळ मिळाले. या दोन्ही मांडुळांची काळ्याबाजारातील किंमत अनुक्रमे ४० लाख आणि २० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.५५ लाखांत विक्री करणार होतेपोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी जंगलात खोदकाम करीत असताना हे दोन्ही मांडूळ सापडले होते. मांडुळांना गुप्तधन काढणारे लोक मागेल त्या किमतीत खरेदी करतात ही बाब त्यांना समजली होती. यामुळे त्यांनी या मांडुळांची किंमत ५५ लाख रुपये ठरविली होती. ते मुंबईला जाऊन मांडूळ विक्री करणार होते.वन विभागाकडे सुपूर्दकाळ्या बाजारात विक्री होण्यापूर्वीच पोलिसांनी दोन्ही मांडूळ जप्त केल्यानंतर या कारवाईची माहिती वन विभागास देण्यात आली. १७ रोजी सकाळी वन विभागाचे अधिकारी एस. वाय. गवंडर, वनपाल पाटील, गार्ड एम. पी. कांबळे यांच्या ताब्यात दिले.