नोकरीच्या आमिषाने गंडविणारे दोन अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:55 IST2017-12-02T00:55:00+5:302017-12-02T00:55:13+5:30

आरटीओ, सार्वजनिक बांधकाम आणि बीएसएनएलमध्ये लिपिक, शिपाई पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पाच बेरोजगारांना ९ लाखांचा गंडा घालणा-या दोन जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी पकडले. या टोळीकडून विविध उमेदवारांना दिलेली बनावट नियुक्तीपत्रे, मोबाइल हस्तगत केला.

Two lynching suspects for job bribe | नोकरीच्या आमिषाने गंडविणारे दोन अटकेत

नोकरीच्या आमिषाने गंडविणारे दोन अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आरटीओ, सार्वजनिक बांधकाम आणि बीएसएनएलमध्ये लिपिक, शिपाई पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पाच बेरोजगारांना ९ लाखांचा गंडा घालणा-या दोन जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी पकडले. या टोळीकडून विविध उमेदवारांना दिलेली बनावट नियुक्तीपत्रे, मोबाइल हस्तगत केला.
प्रशांत दिनकर जंजाळ ऊर्फ अजय दिनेश पाटील (३३, रा. लासुरा, ता. शेगाव, ह.मु. जळगाव) आणि वैभव भगवान भोसले (१९, रा. करंजवन, ता. दिंडोरी, जि. नाशिक) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सिडको एन-२ येथील ठाकरेनगर येथे कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर चालविणाºया सुनील जाधव यांची आणि आरोपी प्रशांत ऊर्फ अजय पाटील याची चार महिन्यांपूर्वी ओळख झाली. त्यावेळी आरोपी सिडको एन-२ येथे राहत होता. जाधव यांनी त्याचा बेरोजगार साला बंडू राठोड आरटीओ कार्यालय पुणे येथे लिपिक पदासाठी ११ लाख रुपये तर सेवक पदासाठी ७ लाख रुपये दर त्याने सांगितला. नोकरीची आॅर्डर हातात मिळाल्यानंतर टोकन म्हणून काही रक्कम आणि रुजू झाल्यावर उर्वरित रक्कम द्यावी, असा व्यवहार ठरला. यावेळी त्यांच्याकडे काम करणाºया सुनील अंभोरे याच्यासह अन्य तीन नातेवाईकांनाही नोकरीसाठी पैसे देण्याची तयारी दर्शविली. सर्व पाच उमेदवारांच्या नोकरीची नियुक्तीपत्रे तक्रारदार यांच्या ईमेलवर त्याने पाठविली. मेलवर नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर तक्रारदार यांनी सर्वांचा पहिला टप्पा म्हणून एकूण ९ लाख रुपये आरोपींना दिले. यातील काही रक्कम चेकने तर काही रोख होती. रक्कम मिळताच दोन्ही आरोपी गायब झाले. त्यामुळे तक्रार नोंदविण्यात आली.

Web Title: Two lynching suspects for job bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.