शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

सॉफ्टवेअरने दरवाजाचे लॉक उघडले; हायटेक किटने ४० मिनिटांत दोन आलिशान कार लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 19:57 IST

कारमधून रात्रभर रेकी, स्थानिक दुचाकी चोरांची घेतली मदत

छत्रपती संभाजीनगर : साधारण दहा ते बारा महिन्यांच्या अंतराने शहारात पुन्हा हायटेक किटने कार चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. उस्मानपुऱ्यातून शनिवारी रात्रीतून दोन महागड्या कार चोरून नेल्या. अवघ्या ४० मिनिटांमध्ये चोरी केली. तिसऱ्या कारमध्ये अपयश आल्यानंतर त्यांनी महत्त्वाचे पार्ट्स काढून कार तशीच सोडून पोबारा केला.

आर्थिक सल्लागार प्रशांत शिंदे (४७, रा. एन-४, सिडको) यांनी २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांची ह्युंडाई अल्काझार कार (एमएच २० एफवाय ४९०७) उस्मानपुऱ्यातील जयनगरमधील कार्यालयासमोर उभी करून दुचाकीने घरी गेले. मंगळवारी सकाळी ते कार्यालयात गेले असता, कार दिसली नाही. आजूबाजूला चौकशी केल्यावर जवळच राहणारे व्यावसायिक महेश मुकेश सेहगल (४३) यांची ह्युंडाई कंपनीची क्रेटा कार (एमएच २० डीजे ८५२६) देखील चोरीला गेल्याचे समजले. शिवाय, जयंत सोनी (६२) यांची क्रेटा कार या टोळीने चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना अपयश आल्याने म्युजिक सिस्टम पॅनल व अन्य महत्त्वाचे पार्ट्स चोरले.

आलिशान कारमधून आले चोरटे२०२२, २०२३ या वर्षांमध्ये ठराविक काळानंतर या टोळ्या सक्रिय झाल्या होत्या. बाप लेकाची एक टोळी बुलढाणा, तर दुसरी टोळी जालन्यात आहे. अशा टोळ्या दिल्ली, झारखंडमध्ये अधिक सक्रिय आहेत. राज्यातील चोरांनीही हे तंत्रज्ञ अवगत केले. उस्मानपुऱ्यात सोमवारी मध्यरात्री २ ते २.३० दरम्यान चोर क्रेटा कारमधून आले. त्यांच्यासोबत दुचाकीवर साथीदार होते. एक चोर दरवाज्याजवळ तर दुसरा बोनटजवळ उभा राहून किटच्या मदतीने कार उघडतात.

नेमके काय आहे तंत्रज्ञान ?- ओबीडी डिव्हाइसचा वापर होतो. हे चीनमधून मागवले जाते.- किटद्वारे कारचा इंजिन कोड स्कॅन करून विशिष्ट सॉफ्टवेअरच्या मदतीने ते कारचे लॉक उघडतात.- एकाच वेळी दरवाजा व बोनटमधील वायरमध्ये बदल करून दरवाजा उघडतात.- ओबीडी डिव्हाइस कारला कनेक्ट केले जाते. त्यानंतर कारचे सेन्सर, जीपीएस बंद होते.- मग बनावट चावीने कार सुरू करून पसार होतात.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी