दोन लाख नव्वद हजारांचा ऐवज लंपास
By Admin | Updated: October 31, 2016 00:10 IST2016-10-31T00:06:13+5:302016-10-31T00:10:44+5:30
ब्दनापूर : तालुक्यातील उज्जैनपुरी येथे एका घराचे कुलूप तोडून घरातील नगदी एक लाख दहा हजारांसह सोन्याचे दागदागिने असा एकूण दोन लाख नव्वद हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.

दोन लाख नव्वद हजारांचा ऐवज लंपास
ब्दनापूर : तालुक्यातील उज्जैनपुरी येथे एका घराचे कुलूप तोडून घरातील नगदी एक लाख दहा हजारांसह सोन्याचे दागदागिने असा एकूण दोन लाख नव्वद हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.
तालुक्यातील उज्जैनपुरी येथे शनिवारी बाबासाहेब शिंदे हे आपल्या नवीन घराला कुलूप लावुन गावातील घरात झोपण्यासाठी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी रात्री त्यांच्या नवीन घराचे कुलूप तोडून घरातील दोन लाकडी पेट्या उचलून नेल्या.
या पेट्यातील एका लोखंडी पेटीतील एक लाख दहा हजार नगदी, एक लाख ऐंशी हजाराचे सोन्याचे
मणी, सोन्याची एकदानी, सोन्याचे झुंबर व अन्य दागिने असा एकूण दोन लाख नव्वद हजारांचा ऐवज चोरून नेला.
या लाकडी पेट्या गावापासून जवळच असलेल्या एका शेतात सापडल्या. त्या पेट्यातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते. सदर प्रकरणी बाबासाहेब शहादेव शिंदे यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूद्ध बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)