वसमतमध्ये अडीच लाखांची रोकड जप्त

By Admin | Updated: September 20, 2014 00:04 IST2014-09-19T23:46:19+5:302014-09-20T00:04:15+5:30

वसमत : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वाहन तपासणी मोहीम सुरू झाली आहे.

Two lakh cash seized in Vasamat | वसमतमध्ये अडीच लाखांची रोकड जप्त

वसमतमध्ये अडीच लाखांची रोकड जप्त

वसमत : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वाहन तपासणी मोहीम सुरू झाली आहे. शुक्रवारी वसमत येथील आसेगाव टी पाँईटवर वसमत पोलिसांनी वाहन तपासणी प्रारंभ केली असता नांदेडहून परभणीकडे जाणाऱ्या एका कारमध्ये अडीच लाख रुपयांची रोख रक्कम आढळली.
वसमत येथील आसेगाव टी पाँईटजवळ शुक्रवारी सायंकाळी वसमत पोलिसांनी पथकाने वाहन तपासणी मोहीम हाती घेतली होती. नांदेडहून परभणीकडे जाणारी तवेरा (कार क्र. जी.जे.९ बी.ए. ७५२७) ला तपासणीसाठी थांबण्यात आले असता कारमधील बॅगमध्ये रोख आढळली. सदर कार वसमत पोलीस ठाण्यात तपासणीसाठी आणण्यात आली आहे. कारमध्ये सुमारे अडीच लाख रुपये रोख रक्कम असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत. सदर कार ही गुजरात येथील हिमतनगर येथील व्यापाऱ्याची असून व्यापाऱ्यांकडून देणी वसुलीसाठी जात असल्याचे कारमधील व्यक्तीचे म्हणणे आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत तपासणी व चौकशी प्रक्रिया सुरू होती. परिणामी पोलिसांत नोंद नव्हती.
घटनास्थळी डिवायएसपी पियुष जगताप, ताटे, फौजदार कायंदे, मुंडे आदींसह कर्मचारी हजर होते. (वार्ताहर)

Web Title: Two lakh cash seized in Vasamat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.