दोन लाखांवर जनावरे छावणीच्या आश्रयाला
By Admin | Updated: March 28, 2016 00:21 IST2016-03-27T23:50:18+5:302016-03-28T00:21:37+5:30
बीड : चारा टंचाई जिल्ह्यात तीव्र जाणवू लागली आहे. आजघडीला २ लाख १६ हजार ८६६ जनावरे छावणीच्या आश्रयाला आहेत. एकूण २३७ छावण्या प्रत्यक्ष सुरू आहेत.

दोन लाखांवर जनावरे छावणीच्या आश्रयाला
बीड : चारा टंचाई जिल्ह्यात तीव्र जाणवू लागली आहे. आजघडीला २ लाख १६ हजार ८६६ जनावरे छावणीच्या आश्रयाला आहेत. एकूण २३७ छावण्या प्रत्यक्ष सुरू आहेत.
जिल्ह्यात एकूण ८ लाखांवर जनावरांची संख्या आहे. मागील चार वर्षांपासून दुष्काळ असल्याने सिंचन प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. अशा परिस्थितीत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चाऱ्याअभावी दुग्ध व्यवसायदेखील संकटात आला आहे. जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने जिल्ह्यात २५९ छावण्यांना मंजुरी दिली आहे. पैकी २३७ छावण्या सुरू आहेत. छावण्यांमध्ये मोठ्या जनावरांची संख्या १ लाख ९८ हजार ५७५, तर छोटे १८ हजार २९१ एवढ्या जनावरांची संख्या आहे. (प्रतिनिधी)