दोन ट्रकच्या धडकेत एक ठार, दोन जखमी

By Admin | Updated: December 17, 2015 23:48 IST2015-12-17T23:45:57+5:302015-12-17T23:48:43+5:30

कळमनुरी : येथून जवळच असलेल्या जिजाऊ शाळेजवळ शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोन ट्रकची समोरसमोर धडक झाल्याने एकजण जागीच ठार तर दोन जण जखमी

Two killed, two injured in two trucks | दोन ट्रकच्या धडकेत एक ठार, दोन जखमी

दोन ट्रकच्या धडकेत एक ठार, दोन जखमी

कळमनुरी : येथून जवळच असलेल्या जिजाऊ शाळेजवळ शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोन ट्रकची समोरसमोर धडक झाल्याने एकजण जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना १७ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता घडली.
शेख वकील शेख अमीन क्लिनर (हरियाना) यांच्या फिर्यादीवरून ट्रक क्र. एम. आर. ५५ एस. ३८०३ च्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीताने आपल्या ताब्यातील ट्रक क्रमांक एच. आर. ५५ एस. ३८०३ च्या चालकाने हयगय व निष्काळजीपणाने ट्रक चालवून ट्रक क्र. एचआर- ३८- टी ७७८३ यास समोरून जोराची धडक दिली. फिर्यादी शेख वकील हा जखमी झाला.
फिर्यादीचा भाऊ शेख फारुक शे. अनिस (वय ४०) हा जागीच मरण पावला. अपघातात ट्रक क्र. एच आर ५५ एस. ३८०३ चा चालक प्रवीणसिंग (वय ३५) क्लिनर, गुरमितासिंग हे दोघे जखमी झाले. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच पोनि मुकुंद देशमुख, फौजदार विनायक लंबे, एस. एस. दीपक, संजय मार्के, श्रीराम असोले, शेख वसीम, मो. समी हे घटनास्थळी जावून जखमींना व मयतास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर दोन्ही वाहने मुख्य रस्त्यावरच होती. त्यामुळे काही वेळा वाहतूक ठप्प होती. अपघातग्रस्त ट्रक बाजूला केल्यानंतर सुरळीत करण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती.

Web Title: Two killed, two injured in two trucks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.