कुंबेफळमध्ये ट्रक-रिक्षा अपघातात दोन ठार
By Admin | Updated: September 11, 2014 00:23 IST2014-09-11T00:21:15+5:302014-09-11T00:23:30+5:30
केज : केज - अंबाजोगाई राज्य मार्गावरील कुंबेफळ शिवारात ट्रक-रिक्षा अपघात होऊन तिघेजण जखमी झाले होते़ त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़

कुंबेफळमध्ये ट्रक-रिक्षा अपघातात दोन ठार
केज : केज - अंबाजोगाई राज्य मार्गावरील कुंबेफळ शिवारात ट्रक-रिक्षा अपघात होऊन तिघेजण जखमी झाले होते़ त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ मंगळवारी रात्री १० वाजता हा अपघात झाला़
कोंडीबा ज्ञानोबा तिडके (४७, रा़ भोगलवाडी, ता़ धारूर), सावित्रीबाई तुकाराम चाटे (३६, रा़ तांबवा, ता़ केज) अशी मयतांची नावे आहेत़ तुळसाबाई बळीराम लांब (रा़ बनकरंजा, ता़ केज) या जखमी असून त्यांच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
लातूर येथून गुळाच्या ढेपी घेऊन अहमदनगरकडे निघालेला ट्रक क्रमांक एमएच १६/७२१९ कुंबेफळ शिवारात आला़ रिक्षा क्रमांक एमएच ४४/४२३० ला ट्रकने समोरासमोर उडवले़ ट्रकचालक नवनाथ भानुदास पालवे (रा़ कोल्हार, ता़ पाथर्डी, जि़ अहमदनगर) हा पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नागरिकांनी त्याला पाठलाग करून पकडले़ युसूफवडगाव ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ (वार्ताहर)