तुळजापुरात दोघांचे अपहरण
By Admin | Updated: October 28, 2014 00:58 IST2014-10-28T00:01:18+5:302014-10-28T00:58:17+5:30
तुळजापूर : बाप-लेकास मारहाण करीत गाडीत घालून अपहरण केल्याप्रकरणी आठ जणाविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली़

तुळजापुरात दोघांचे अपहरण
तुळजापूर : बाप-लेकास मारहाण करीत गाडीत घालून अपहरण केल्याप्रकरणी आठ जणाविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली़
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर येथील हुडको परिसरात उमा माने या कुटुंबासह राहतात़ त्यांचा मुलगा अभिषेक माने व पती राजेंद्र माने यांना सोमवारी सकाळी गावातीलच विशाल छत्रे, अमित अरगडे, सुरज साठे, अतुल कदम, मनोज गवळी, योगेश दळवी, नेताजी दळवी, संभाजी पलंगे व इतरांनी मागील भांडणाची कुरापत काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गाडीत घालून पळवून नेल्याचे उमा राजेंद्र माने यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़ या फिर्यादीवरून वरील आठ जणाविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदर घटनेचा अधिक तपास फौजदार बुवा हे करीत आहेत़
(वार्ताहर)
येरमाळा : दुचाकीस जोराची धडक देत दोन ठार तर एकास गंभीर जखमी केल्याप्रकरणी कार चालकाविरूध्द येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हा अपघात रविवारी सायंकाळी तेरखेडा (ता़वाशी) नजीक घडला होता़ याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तेरखेडा येथील सुरज आगलावे (वय-१९), विष्णू महादेव माळी (वय-१९) व बबन राजेंद्र कडवकर हे तिघे रविवारी सायंकाळी दुचाकीवरून (क्ऱएम़एच़१३-एक्स ७३७६) वरून गावाकडे जात होते़ त्यावेळी वाहनाला ओव्हरटेक करून समोरून आलेल्या इंडिका कारने (क्ऱएम़एच़०४- वाय़६९०७) दुचाकीस जोराची धडक दिली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुरज आगलावे, विष्णू माळी या दोघांचा जागीच मृत्यू झाला़ तर बबन कडवकर हा गंभीर जखमी झाला़ याबाबत अमोल जगन्नाथ आगलावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालकाविरूध्द येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोहेकॉ जगताप हे करीत आहेत़