चार ठिकाणी धाड टाकून दोनशे लीटर गावठी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:03 IST2021-09-03T04:03:36+5:302021-09-03T04:03:36+5:30

पाचोड : पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे पाचोड पोलिसांनी चार ठिकाणी धाड टाकून तब्बल दोनशे दोन लीटर गावठी ...

Two hundred liters of village liquor were seized in four raids | चार ठिकाणी धाड टाकून दोनशे लीटर गावठी दारू जप्त

चार ठिकाणी धाड टाकून दोनशे लीटर गावठी दारू जप्त

पाचोड : पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे पाचोड पोलिसांनी चार ठिकाणी धाड टाकून तब्बल दोनशे दोन लीटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पाचोड पोलिसांनी विहामांडवा येथे चार पथके तयार करून चार ठिकाणी छापा टाकला. यात संदीप डुकले यांच्या घरातून ५२ लीटर गावठी दारू जप्त करण्यात आली. कल्याण गायकवाड यांच्या घरातून ३० लीटर, उत्तम गुंजाळ यांच्या घरातून ९५ लीटर व सविता दत्तू माळी या महिलेच्या घरातून २५ लीटर अशी एकूण २०२ लीटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात संदीप डुकले, कल्याण गायकवाड, उत्तम गुंजाळ व सविता माळी या चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, पाेलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, गोरक्ष खरड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय मदने, जमादार आर. बी. आव्हाड, जगन्नाथ उबाळे, आप्पासाहेब माळी, फोलाने, पवन चव्हाण, हनुमान धनवे, काकडे, पगारे व महिला पोलीस राठोड यांनी केली.

फोटो :

Web Title: Two hundred liters of village liquor were seized in four raids