जिल्ह्यात सक्रिय कोरोना रुग्णसंख्या दोनशेपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:02 IST2021-09-02T04:02:17+5:302021-09-02T04:02:17+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी ३२ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आणि कोरोनाच्या सक्रिय म्हणजे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दोनशेपार ...

जिल्ह्यात सक्रिय कोरोना रुग्णसंख्या दोनशेपार
औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी ३२ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आणि कोरोनाच्या सक्रिय म्हणजे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दोनशेपार गेली. जिल्ह्यात सध्या २०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असताना गेल्या २४ तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात रोज निदान होणारी रुग्णसंख्या ५० च्या खालीच आहे. मात्र सक्रिय रुग्णांचा आलेख दररोज वाढतच आहे. जिल्ह्यात मंगळवारी निदान झालेल्या ३२ रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील १८ आणि ग्रामीण भागातील १४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ८६, तर ग्रामीण भागातील ११७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या १ लाख ४८ हजार ७२ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४४ हजार ३३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३ हजार ५३१ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ९ आणि ग्रामीण भागातील ११, अशा २० रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना शहरातील कैलासनगर येथील ४३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
कांचनवाडी १, डी मार्ट २, सिद्धार्थनगर १, देवळाई चौक १, शहाबाजार १, घाटी परिसर १, टी.व्ही सेंटर १, बीड बायपास २, मिलकॉर्नर १, सिडको १ अन्य ६.
ग्रामीण भागातील रुग्ण
औरंगाबाद २, गंगापूर ४, खुलताबाद १, वैजापूर ३, पैठण ४.