बीडमध्ये दोन घरफोड्या
By Admin | Updated: March 28, 2017 23:29 IST2017-03-28T23:28:37+5:302017-03-28T23:29:49+5:30
बीड : शहरातील एकनाथनगर भागात गुढीपाडव्यादिवशीच दोन घरे फोडून चोरांनी पाऊण लाखांचा ऐवज लंपास केला.

बीडमध्ये दोन घरफोड्या
बीड : शहरातील एकनाथनगर भागात गुढीपाडव्यादिवशीच दोन घरे फोडून चोरांनी पाऊण लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
एकनाथनगर भागात कृष्णगंगा अपार्टमेंट असून तेथे राहणारे लैलेश बारगजे व शेजारील ज्ञानोबा सरोदे यांच्या घराचा दरवाजा उचकटून चोरांनी आत प्रवेश केला. बारगजे यांच्या घरातून दागिने व रोख रक्कम असा ५४ हजार रुपयांचा ऐवज पळविला तर सरोदे यांच्या घरातून १४ हजार रुपये लंपास केले. पहाटे ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी उपअधीक्षक गणेश गावडे, निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी भेट देऊन पाहणी केली.
याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)