अंबड ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या
By Admin | Updated: July 20, 2015 00:51 IST2015-07-20T00:27:16+5:302015-07-20T00:51:23+5:30
जालना : अंबउ शहरातील सुरंगे नगरात एका घरफोडीत चोरट्यांनी ३० हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना १७ जुलै रोजी घडली. अंबड शहरातील सुरंगे नगर येथील रहिवाशी अर्चना

अंबड ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या
जालना : अंबउ शहरातील सुरंगे नगरात एका घरफोडीत चोरट्यांनी ३० हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना १७ जुलै रोजी घडली.
अंबड शहरातील सुरंगे नगर येथील रहिवाशी अर्चना पांडुरंग बोरडे ह्या बाहेरगावी गेल्या असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराची कडी काढून आत प्रवेश केला. व कपाटातील ३० हजार रूपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोहे. का खंडागळे हे करीत आहे.
रवाना येथे घरफोडी
राणीउंचेगाव- अंबड तालुक्यातील रवना येथे एका घरफोडीत चोरट्यांनी ३१ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना १८ जुलै रोजी घडली. रवना दर्गा येथील रहेमानी शकिल अब्दुल सत्तार हे बाहेर गावी गेले असता १८ जुलै रोजी रात्री १२.३० ते ४ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोडा तोडून आत प्रवेश करून कपाटातील ३१ हजाराचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी रहेमानी शकील यांच्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाहेका पाचरणे हे करीत आहे. दरम्यान अंबड पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.