शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून दोन गट भिडले; एकाच्या डोक्याला पिस्तूल लावले, चाकूने केले वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:28 IST

दोन गटांतील मारहाणीचे प्रकरण; परस्परविरोधी तक्रारीवरून ३० जणांविरुद्ध गुन्हा

खुलताबाद : तालुक्यातील खिर्डी-सोनखेडा शिवारातील शेताच्या वादातून दोन गटांत मंगळवारी दुपारी झालेल्या हाणामारीप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून खुलताबाद पोलिस ठाण्यात जवळपास ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत एकाच्या डोक्याला पिस्तूल लावून चाकूने वार केल्याची बाब समोर आली आहे. या हाणामारीत ९ जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत हुसेन इकबाल बेग यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, खिर्डी-सोनखेडा शिवारातील त्यांच्या गट नंबर ११४ मध्ये शेतीमध्ये मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ७ ते ८ अनोळखी महिला, १० ते १५ ते वीस अनोळखी पुरुष शेतातील तार कंपाऊंड तोडू लागले. बेग यांनी याबाबत विचारणा केली असता, त्यातील संशयित अनोळखी महिला, पुरुष आरोपींनी गणेश सोनवणे यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता सोड, नाही तर तुला जीवे मारून टाकू, अशी धमकी देत त्यातील एकाने हुसेन बेग यांच्या डोक्याला पिस्तूल लावले. दुसऱ्याने बेग यांना नाकावर बुक्का मारला व एकाने जीवे मारण्याचे उद्देशाने हातातील चाकू पोटात व दंडात मारून हुसेन बेग यांना जखमी केले.

तेथील तार कंपाउंडचे काम करणारे मिर्झा शाहबाज शेख, उबेद बेग अकबर बेग, अकबर शेख, ताहीख बेग (सर्व रा. खुलताबाद) हे हुसेन बेग यांना वाचण्यासाठी गेले असता, आरोपींनी त्यांनाही चाकू, लोखंडी गजाने मारहाण केली. या मारहाणीत हुसेन बेग इकबाल बेग, अकबर बेग इकबाल बेग, उबेद बेग कादर बेग, सलमान शेख यांच्यासह सात ते आठजण जखमी झाले. या जखमींवर खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काहींना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच काही वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी बेग यांच्या फिर्यादीवरून गणेश सोनवणे (रा. सोनखेडा) व इतर सात ते आठ अनोळखी महिला आणि १५ ते २० अनोळखी पुरुष यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याच प्रकरणी दुसऱ्या बाजूने ज्योती मिलिंद तुपविहिरे (रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली असून, त्यात म्हटले आहे की, आम्ही त्या ठिकाणी गेलो असता, समोरच्या लोकांनी शिवीगाळ करत लाठ्या-काठ्यांनी आम्हाला जबर मारहाण केली. त्यावरून त्यावरून १० ते १५ अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दाखल केला दंगलीचा गुन्हाखुलताबाद पोलिसांच्या वतीनेही याप्रकरणी जमादार उत्तम खटके यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, दोन्ही गटांच्या लोकांनी बेकायदेशीररीत्या लोक जमा करून गोंधळ घातला असून, कायदा व सुव्यवस्था बिघडवली. त्यामुळे दोन्ही गटांविरोधात खुलताबाद पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांनी दिली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरी