छावणीत दोन गटांत जोरदार राडा, दोन्ही गटांतील १६ जणांविरुद्ध गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:57 IST2017-08-05T00:57:33+5:302017-08-05T00:57:33+5:30

जुन्या वादातून छावणीतील पेन्शनपुरा भागात गुरुवारी रात्री दोन गटांत जोरदार हाणामारी झाली.

 Two groups in the camp strongly rada, crime against 16 people in both groups | छावणीत दोन गटांत जोरदार राडा, दोन्ही गटांतील १६ जणांविरुद्ध गुन्हे

छावणीत दोन गटांत जोरदार राडा, दोन्ही गटांतील १६ जणांविरुद्ध गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जुन्या वादातून छावणीतील पेन्शनपुरा भागात गुरुवारी रात्री दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. यामुळे पेन्शनपुरा भागात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. छावणी पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही गटांतील १६ राडेबाजांविरुद्ध दंगल आणि हाणामारी केल्याचे गुन्हे नोंदविले.
छावणी ठाण्याचे निरीक्षक इंदलसिंग बहुरे म्हणाले की, पेन्शनपुरा येथील महंमद इद्रिस महंमद इब्राहिम (३७) आणि शेख हमीद यांच्या कुटुंबात वाद आहे. त्यातून गुरुवारी रात्री दोन्ही गट एकमेकांवर चाल करून गेले. पोलिसांनी दोन्ही गटांच्या लोकांना ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. याप्रकरणी महंमद इद्रिस यांनी आरोपी शेख हमीद, शेख सोहेल, शेख अक्रम, महंमद अब्दुल, शेख अहेसान, शेख शोएब, सय्यद विखार, शेख हसीब, रईसा बेगम, हुमेरा बेगम, फातेमा बेगम आणि रोहिना बेगम नासेर खान यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविली. भावाविरुद्ध सरंक्षण मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयात तक्रार केल्याच्या कारणावरून हल्ला चढविल्याचे तक्रारीत नमूद केले. आरोपींनी तक्रारदारांची दुचाकी पाडून नुकसान केले. शेख हमीद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मोहंमद इद्रिस, नयन पांडे, मोहंमद इलियास आणि कासीम यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. तक्रारदारांनी आरोपी इद्रिस यांना उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत लाकडी दांड्याने मारहाण केल्याचे म्हटले.

Web Title:  Two groups in the camp strongly rada, crime against 16 people in both groups