शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

दोन सराफा दुकाने फोडली

By admin | Updated: January 18, 2015 00:29 IST

ईट : उस्मानाबाद जिल्ह्यात चोरट्यांनी अक्षरश: धुडगूस घातला आहे़ तुळजापूर येथील जबरी घरफोडीच्या घटनेला आठ दिवसांचा कालावधी लोटण्यापूर्वीच चोरट्यांनी

ईट : उस्मानाबाद जिल्ह्यात चोरट्यांनी अक्षरश: धुडगूस घातला आहे़ तुळजापूर येथील जबरी घरफोडीच्या घटनेला आठ दिवसांचा कालावधी लोटण्यापूर्वीच चोरट्यांनी भूम तालुक्यातील ईट येथील दोन सराफा दुकाने फोडली़ दुकानातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा तब्बल नऊ लाख ५ हजार ८४० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ईट येथील मुख्य मार्गावर सराफा दुकाने आहेत़ येथील सराफा लाईनमधील प्रशांत रोटे यांचे प्रशांत ज्वेलर्स व दत्तात्रय वेदपाठक यांचे वेदपाठक सुवर्णकार ही दुकाने जवळाजवळ आहेत़ रोटे व वेदपाठक हे दोघे शुक्रवारी नेहमीप्रमाणे दुकाने बंद करून गेली होती़ दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास लोखंडी कटावणीच्या सहाय्याने दोन्ही दुकानाचे शटर उचकटून मुद्देमाल लंपास केला़ ही घटना पहाटे समोर आल्यानंतर ईटसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे़ चोरट्यांनी प्रशांत ज्वेलर्स या दुकानातील सोन्याचे ४ लाख ५७ हजार ६०० रूपयांचा तर चांदीचा २ लाख ४९ हजार ७५० रूपयांचा व रोख २५ हजार असा एकूण ७ लाख ३२ हजार ३५० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ तर शेजारील वेदपाठक यांच्या दुकानातील लॉकरमध्ये ठेवलेले ६६ हजार रूपये, ९४ हजार ५०० रूपयांचे सोन्याचे दागिने व १३ हजार रूपयांचे चांदीचे दागिने असा एक लाख ७३ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ चोरट्यांनी असा एकूण नऊ लाख ५ हजार ८४० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ या प्रकरणी वाशी ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोनि एस़पी़पवार हे करीत आहेत़ दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिती टिपरे, पोनि एस़जी़शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली़ बीड येथील श्वान पथक, ठसे तज्ञ, स्थागुशा, दरोडा प्रतिबंधक पथकाचेही अधिकारी, कर्मचारी आले होते़