दोन सराफा दुकाने फोडली

By Admin | Updated: January 18, 2015 00:29 IST2015-01-18T00:26:43+5:302015-01-18T00:29:21+5:30

ईट : उस्मानाबाद जिल्ह्यात चोरट्यांनी अक्षरश: धुडगूस घातला आहे़ तुळजापूर येथील जबरी घरफोडीच्या घटनेला आठ दिवसांचा कालावधी लोटण्यापूर्वीच चोरट्यांनी

Two gold shops broke down | दोन सराफा दुकाने फोडली

दोन सराफा दुकाने फोडली


ईट : उस्मानाबाद जिल्ह्यात चोरट्यांनी अक्षरश: धुडगूस घातला आहे़ तुळजापूर येथील जबरी घरफोडीच्या घटनेला आठ दिवसांचा कालावधी लोटण्यापूर्वीच चोरट्यांनी भूम तालुक्यातील ईट येथील दोन सराफा दुकाने फोडली़ दुकानातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा तब्बल नऊ लाख ५ हजार ८४० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
ईट येथील मुख्य मार्गावर सराफा दुकाने आहेत़ येथील सराफा लाईनमधील प्रशांत रोटे यांचे प्रशांत ज्वेलर्स व दत्तात्रय वेदपाठक यांचे वेदपाठक सुवर्णकार ही दुकाने जवळाजवळ आहेत़ रोटे व वेदपाठक हे दोघे शुक्रवारी नेहमीप्रमाणे दुकाने बंद करून गेली होती़ दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास लोखंडी कटावणीच्या सहाय्याने दोन्ही दुकानाचे शटर उचकटून मुद्देमाल लंपास केला़ ही घटना पहाटे समोर आल्यानंतर ईटसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे़ चोरट्यांनी प्रशांत ज्वेलर्स या दुकानातील सोन्याचे ४ लाख ५७ हजार ६०० रूपयांचा तर चांदीचा २ लाख ४९ हजार ७५० रूपयांचा व रोख २५ हजार असा एकूण ७ लाख ३२ हजार ३५० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ तर शेजारील वेदपाठक यांच्या दुकानातील लॉकरमध्ये ठेवलेले ६६ हजार रूपये, ९४ हजार ५०० रूपयांचे सोन्याचे दागिने व १३ हजार रूपयांचे चांदीचे दागिने असा एक लाख ७३ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ चोरट्यांनी असा एकूण नऊ लाख ५ हजार ८४० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ या प्रकरणी वाशी ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
तपास पोनि एस़पी़पवार हे करीत आहेत़ दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिती टिपरे, पोनि एस़जी़शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली़ बीड येथील श्वान पथक, ठसे तज्ञ, स्थागुशा, दरोडा प्रतिबंधक पथकाचेही अधिकारी, कर्मचारी आले होते़

Web Title: Two gold shops broke down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.