शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दुकाने फोडणाऱ्या राजस्थानी टोळीतील दोघे चोरटे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 20:27 IST

कारवरील नावावरून लागला चोरट्यांचा शोध

औरंगाबाद: पुण्याच्या ट्रॅव्हल्स कंपनीकडून विनाचालक कार भाड्याने घेऊन राज्यात विविध ठिकाणी दुकाने फोडणाºया टोळीतील दोघांना  क्रांतीचौक ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पाठलाग करून  शिताफीने अटक केली. औरंगाबाद  शहरातील ३ दुकाने आरोपींनी  फोडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सुजाराम पुनबाराम माली (२४) आणि जितेंद्रकुमार मांगीलाल माली (२३, दोघे रा. राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, व्यापारी रमेश झंवर यांचे गोमटेश मार्केटमधील पशुऔषधालय ३१ जुलैच्या रात्री  फोडून चोरट्यांनी गल्लयातील ४९ हजार ५५० रुपये पळविले होते.  या दुकानाशेजारील कापड दुकान फोडून जीन्स पॅण्ट आणि अन्य कपडेही चोरून नेले होते. तत्पूर्वी १५ जुलैला गुलमंडी येथील चितलांगे गिफ्ट सेंटरचे शटर उचकटले. परंतु आत मोठी काच असल्याने चोरट्यांना दुकानात प्रवेश करता आला नव्हता.  झंवर यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक उत्तम मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, पोलीस उपनिरीक्षक  सोनटक्के, सायबर ठाण्याच्या उपनिरीक्षक सुशीला खरात, डी. बी. पथकातील कर्मचारी नसीम खान, शेख सलीम,राजेश फिरंगे, मिलिंद भंडारे आणि हनुमंत चाळणीवाड यांच्या पथकाने तपास सुरू केला. सीसीटिव्ही कॅ मेºयात चोरटे आणि त्यांची कार कैद झाली होती. चोरटे बिनधास्तपणे शटर उचकटून चोरी करताना दिसले. अधिक तपासाअंती चोरटे शहराबाहेरील असल्याचे त्यांना समजले.कारवरील नावामुळे  लागला चोरट्यांचा शोधकारवर  रेव्ह हे इंग्रजी नाव पोलिसांना दिसले. पोलिसांनी इंटरनेटवर या नावाचा संदर्भ शोधला तेव्हा या नावाची एक ट्रॅव्हल्स कंपनी पुण्यात असून ती कंपनी विना चालक कार भाड्याने देत असल्याचे, तसेच त्याच्या सर्व कारला जीपीएस यंत्रणा लावण्यात आल्याचे समजले. पोलिसांचे पथक त्या ट्रॅव्हल्स कंपनीकडे गेले आणि ३१ जुलै रोजी औरंगाबादला कोणी कार नेली होती, याबाबत माहिती घेतली. तेव्हा कार बुकींग करणाºयाचा मोबाईल नंबर, आधारकार्ड पोलिसांना मिळाले. तेव्हापासून पोलीस त्यांच्यावर नजर ठेवून होते. मात्र ते सारखे शहर बदलत होते. दरम्यान आरोपी समर्थनगर येथे आल्याचे कळताच पोलिसांनी एका लॉजमधून त्यांच्या मुसक्या आवळल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद