दोन ठिकाणच्या छाप्यात १४ जुगारी पकडले

By Admin | Updated: March 21, 2016 00:22 IST2016-03-20T23:53:29+5:302016-03-21T00:22:32+5:30

\बीड : पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या पथकाने ग्रामीण ठाणे हद्दीतील दोन ठिकाणच्या जुगार अड्ड्यावर रविवारी कारवाईचा दंडुका उगारला.

Two gambling raid took 14 gamblers | दोन ठिकाणच्या छाप्यात १४ जुगारी पकडले

दोन ठिकाणच्या छाप्यात १४ जुगारी पकडले


\बीड : पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या पथकाने ग्रामीण ठाणे हद्दीतील दोन ठिकाणच्या जुगार अड्ड्यावर रविवारी कारवाईचा दंडुका उगारला. माळापुरी येथे माजी आमदार सिराज देशमुख यांच्या शेतात चार, तर कामखेडा येथील जुगार अड्डा उद्ध्वस्त करून १० जणांना रंगेहाथ पकडले.
कामखेडा येथील छाप्यामध्ये ३२ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शेख आमिर, शेख रौफ, शेख राजू, शेख मन्सूर, शेख शब्बीर, बबन गोले, शेख गफूर, राजेश नेवडे, शेख सत्तार, शेख बाबू यांचा समावेश आहे.
माजी आ. सिराज देशमुख यांच्या माळापुरी येथील शेतात पडलेल्या धाडीत काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सुजात देशमुख, संस्थाचालक शेख रसूल हे दोन प्रतिष्ठित, तर संतराम ढाकणे, सय्यद समीर यांना पकडले. त्यांच्याकडून एक कार व रोख २१ हजार ९२० असा १ लाख ७४ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
ही कारवाई सहायक निरीक्षक गजानन जाधव यांच्यासह विष्णू वायबसे, विजय पवार, राहुल शिंदे, अनंत गिरी, पद्मनाभन पाटणकर, संजय चव्हाण यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Two gambling raid took 14 gamblers