ग‌ळफास घेऊन दोन मित्रांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST2021-07-07T04:06:16+5:302021-07-07T04:06:16+5:30

सिल्लोड : तालुक्यातील पिंप्री येथील दोन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री घडली. योगेश सुधाकर खिस्ते ...

Two friends commit suicide by hanging | ग‌ळफास घेऊन दोन मित्रांची आत्महत्या

ग‌ळफास घेऊन दोन मित्रांची आत्महत्या

सिल्लोड : तालुक्यातील पिंप्री येथील दोन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री घडली. योगेश सुधाकर खिस्ते (२३) व ज्ञानेश्वर गणेश शिरसाट (२०) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. त्यांनी ‘आई-बाबा मला माफ करा, आमच्या आत्महत्येला सिल्लोड शहरातील तीन जण जबाबदार आहेत,’ अशी चिठ्ठी लिहून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यानुसार शेख मुश्ताक, शेख मोईन व एका महिलेवर सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा झाला.

पोलीसांनी सांगितले की, योगेश व ज्ञानेश्वर या दोघा मित्रांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर चिठ्ठी व्हायरल केली. ते स्टेटस विजय आनंदा पवार या त्यांच्या मित्राने पाहिले. त्याने दोघांना मोबाईलवर संपर्क केला. मात्र, त्यांनी फोन न घेतल्याने पवार यांनी शोध घेतला. तेव्हा पिंप्री गावातील भुसार मालाच्या गोडाऊनवर शोध घेतल्यानंतर योगेश व ज्ञानेश्वर हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

विजय पवार याने तात्का‌ळ सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. सपोनि प्रल्हाद मुंडे, पोउनि विकास आडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. मंगळवारी उत्तरीय तपासणी झाल्यानंतर दोन्ही युवकांचे मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आले. प्रिंप्री येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत दोघांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या तीनही आरोपींवर गुन्हा दाखल केला. मयत योगेश खिस्ते यांच्या पश्चात एक बहीण, एक भाऊ, आई, वडील तर ज्ञानेश्वर शिरसाठ यांच्या पश्चात एक भाऊ, एक बहीण, आई, वडील असा परिवार आहे.

----

आई-बाबा आम्हाला माफ करा...

योगेश खिस्ते व ज्ञानेश्वर शिरसाठ या मित्रांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात आई-बाबा आम्हाला माफ करा, फार कष्ट करून तुम्ही आम्हाला मोठे केले. पण आमच्यामुळ‌े तुम्हाला कोणी वाईट बोलेल हे आम्हाला सहन होणारच नाही. मोईन व त्याचा मित्र शेख मुश्ताक हे एका महिलेला घेऊन लोकांच्या शेतात रात्री येत होते. आम्ही त्यांना पकडले मात्र त्यांनी आम्हालाच फसविण्याचा प्रयत्न केला. आमच्या आई-वडिलांचा अपमान आम्हाला सहन होणार नाही त्यामुळे आयुष्य संपवीत आहे. रडू नका. बहिणीचे थाटात लग्न करा. आमच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोपींना पोलिसांमार्फत फाशीची शिक्षा द्यायला लावा. परिवाराला तीस लाख रुपये आर्थिक मदत द्या, असे नमूद केले आहे.

---

दोन फोटो आहेत. पासपोट

060721\img_20210706_182311.jpg

मयत फोटो

Web Title: Two friends commit suicide by hanging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.