दोन शेतकर्यांनी नैराश्येतूनच आत्महत्या केल्याचे निष्पन्न
By Admin | Updated: June 5, 2014 00:50 IST2014-06-05T00:23:12+5:302014-06-05T00:50:26+5:30
बदनापूर : तालुक्यात दोन शेतकर्यांनी कर्ज व गारपिटीमुळे शेतीचे झालेले नुकसान यातून नैराश्येपोटी आत्महत्या केली.

दोन शेतकर्यांनी नैराश्येतूनच आत्महत्या केल्याचे निष्पन्न
बदनापूर : तालुक्यात दोन शेतकर्यांनी कर्ज व गारपिटीमुळे शेतीचे झालेले नुकसान यातून नैराश्येपोटी आत्महत्या केली. तहसीलदार, कृषी अधिकारी व पोलिस निरीक्षक यांच्या चौकशीतून हे निष्पन्न झाले आहे. चनेगाव येथील शेतकरी पाटीलबा आबाजी मुटकुळे (वय ७५ ) यांनी २७ मे रोजी राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केली होती. तसेच तुपेवाडी येथील लक्ष्मण आसाराम मांडगे यांनी ३१ मे रोजी हिस्वन शिवारात (ता. जालना) रेल्वे रुळावर आत्महत्या केली होती. या दोन्ही घटनांबाबत २ जून रोजी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व पोलीस निरीक्षक या तीन सदस्यीय समितीने चौकशी केली. या चौकशीबाबत तहसीलदार बालाजी क्षीरसागर म्हणाले की, मयत शेतकरी पाटीलबा आबाजी मुटकुळे यांच्या कुटुंबियांच्या नावे २५ एक र शेती असून या कुटुंबियांच्या नावावर स्टेट बँक आॅफ इंडिया राजूर शाखेचे ८ लाख रूपयांचे कर्ज आहे. तसेच मयत शेतकरी लक्ष्मण आसाराम मांडगे यांच्या नावे इंडियन ओव्हरसीज बँक शाखा जालनाचे १ लाख ५० हजार रूपयांचे कर्ज असून १ हे २९ आर शेतजमीन आहे. या दोन्ही शेतकर्यांच्या जमिनीतील गहू, कापूस, ज्वारी, बाजरी अशा पिकांचे गारपिटीमुळे नुकसान झाले. तसेच मागील वर्षीही शेतीचे ५० पैशापेक्षा कमी उत्पन्न झाले. यामुळे या दोन्ही शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले असून या शेतकर्यांच्या कुटुंबातील वारसाला शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. या चौकशीत ग्रामस्थांचे जबाब पंचनामे व अन्य विहित नमुन्यात अहवाल असून हा अहवाल जिल्हाधिकार्यांकडे पाठविण्यात आला आहे.