विष्णूपुरीचे दोन दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:26 IST2017-08-30T00:26:43+5:302017-08-30T00:26:43+5:30

विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रात तसेच परभणी जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील येवा वाढला असून प्रकल्पाचे दोन दरवाजे मंगळवारी उघडण्यात आले. एक दरवाजा दुपारी १२ वाजता तर दुसरा दरवाजा दुपारी २ वाजता उघडण्यात आला आहे.

 Two doors of Vishnupurya opened | विष्णूपुरीचे दोन दरवाजे उघडले

विष्णूपुरीचे दोन दरवाजे उघडले

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रात तसेच परभणी जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील येवा वाढला असून प्रकल्पाचे दोन दरवाजे मंगळवारी उघडण्यात आले. एक दरवाजा दुपारी १२ वाजता तर दुसरा दरवाजा दुपारी २ वाजता उघडण्यात आला आहे.
विष्णूपुरी प्रकल्प तुडुंब भरला आहे. मागील आठ दिवसांत चारवेळा प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागले आहेत. आतापर्यंत एकच दरवाजा उघडावा लागत होता. मात्र आज मंगळवारी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यातील पूर्णा, झरी नद्यांना पूर आला आहे. त्याचवेळी डिग्रस बंधाºयाचा एक दरवाजा उघडण्यात आल्यामुळे हे सर्व पाणी विष्णूपुरीत दाखल होत आहे. परिणामी प्रकल्पाचे दोन दरवाजे मंगळवारी उघडले आहेत. दुपारी १२ वाजता एक तर दुसरा दरवाजा २ वाजता उघडण्यात आला.
सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे दोन्ही दरवाजे उघडेच होते. विष्णूपुरीतून नदीपात्रात ९५२ क्युमेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी नदी दुथडी वाहू लागली आहे. पहिल्यांदाच गोदावरी नदीला पूर आला आहे. रात्री उशिरापर्यंत प्रकल्पाचे दरवाजे सुरू राहणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वी २० आणि २१ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला होता़ १६ पैकी १२ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे विष्णूपुरी प्रकल्प तुडुंब भरला होता़ त्यामुळे २१ आॅगस्टला प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता़ त्यानंतर शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली होती़ त्यामुळे पुन्हा एक दरवाजा उघडला होता़ त्यावेळी प्रकल्पात ८० दलघमी एवढा पाणीसाठा होता़ रविवारी पुन्हा तीन तासांसाठी दरवाजा उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला़
या आठवड्यात सलग चौथ्यांदा विष्णूपुरी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत़ दरम्यान, पुरेशा जलसाठ्यामुळे टंचाईचा प्रश्न सुटणार आहे.

Web Title:  Two doors of Vishnupurya opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.