रामनगर येथे कारची झाडाला धडक; दोन डॉक्टर ठार एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 13:58 IST2018-02-20T13:57:01+5:302018-02-20T13:58:02+5:30
रामनगर येथे कार झाडाला धडकल्याने झालेल्या अपघातात दोन डॉक्टर जागीच ठार झाले आहेत.

रामनगर येथे कारची झाडाला धडक; दोन डॉक्टर ठार एक जखमी
औरंगाबाद : रामनगर येथे कार झाडाला धडकल्याने झालेल्या अपघातात दोन डॉक्टर जागीच ठार झाले आहेत. पहाटे तीनच्या दरम्यान झालेल्या या अपघातात एक डॉक्टर गंभीर आहेत.
गोविंदकुमार सतनामसिंग (वय 25, रा. मूळ हरियाणा) लक्ष्मीकांत दगडीया (वय 25, रा. रामनगर) अशी मृत डॉक्टरची नावे आहेत. तर कारमधील अरविंद पवार (रा. म्हाडा कॉलनी) हे डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने घाव घेत मदत कार्य सुरु केले. दोन्ही मृत डॉक्टर गोविंदकुमार व लक्ष्मीकांत हे मुकुंदवाडी येथील एका खाजगी रुग्णालयात वैद्यकीय प्रक्टिस करत होते.