दोन दिवस अमावस्या; शेतकरी पडले संभ्रमात
By Admin | Updated: September 1, 2016 00:59 IST2016-09-01T00:47:03+5:302016-09-01T00:59:22+5:30
जालना : दोन दिवस अमावस्या आल्याने सर्जा-राजाचा पोळा हा सण कधी साजरा करायचा, याबाबत शेतकरी संभ्रमात होते. परंतु जाफराबाद व भोकरदन तालुक्यातील

दोन दिवस अमावस्या; शेतकरी पडले संभ्रमात
जालना : दोन दिवस अमावस्या आल्याने सर्जा-राजाचा पोळा हा सण कधी साजरा करायचा, याबाबत शेतकरी संभ्रमात होते. परंतु जाफराबाद व भोकरदन तालुक्यातील काही गावांमध्ये बुधवारीच हा सण उत्साहात साजरा केला. त्यामुळे काही ठिकाणी सर्जा राजासोबतच बळीराजाला पुरणपोळी मिळाली. काही गावांमध्ये बुधवारी निमंत्रण देऊन गुरुवारी पोळा साजरा केला जाणार आहे.
वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या सर्जा-राजा बद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याचा सण म्हणजे पोळा. या दिवसाच्या दिवशी बळीराजाला बैलगाडीला किंवा वखरणीसाठी औताला जुंपले जात नाही. या दिवसी त्यांची मान-सन्मान दिला जातो. दरम्यान, ज्या गावात बुधवारी पोळा सण साजरा झाला, अशांनी मंगळवारीच बैलांना स्वच्छ धुवून त्यांची पुजा केली. त्यानंतर बुधवारी दुपारनंतर काही गावांमध्ये बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बैलांना सजवण्यात आले होते. मिरवणुकीनंतर बळीराजाला घरी आणले, व येथे आल्यानंतर त्यांची पुजा करून लग्न लावण्यात आले. आज राहिलेल्या गावांमध्ये पोळा साजरा होणार आहे.