विकासकामांच्या उद्घाटनांचा दोन दिवस धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:09 IST2021-01-13T04:09:42+5:302021-01-13T04:09:42+5:30
पांडेय यांनी सांगितले की, शहरात १५ जानेवारीला पालकमंत्री सुभाष देसाई आणि १६ जानेवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ...

विकासकामांच्या उद्घाटनांचा दोन दिवस धडाका
पांडेय यांनी सांगितले की, शहरात १५ जानेवारीला पालकमंत्री सुभाष देसाई आणि १६ जानेवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण होणार आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते चिकलठाणा येथील दीडशे मेट्रीक टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प, कांचनवाडी येथील ३० मेट्रिक टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प यांचे लोकार्पण होणार आहे. याशिवाय शहरात स्मार्टसिटीतून शंभर बसथांबे बनविण्यात आले आहेत. त्यातील एका बसथांब्याचे पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते रेल्वे स्टेशन येथे लोकार्पण केले जाईल. १६ जानेवारीला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अमरप्रित येथील म्यूरल्सचे अनावरण, पडेगाव येथील दीडशे मेट्रिक टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण, स्मार्ट सिटीतून पोलीस आयुक्तालयात सीसीटीव्ही सर्विलन्ससाठी उभारण्यात आलेले कमांड ॲण्ड कंट्रोल रूमचे उद्घाटन केले जाणार आहे. याच दिवशी आदित्य ठाकरे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शहरातील निवडक नागरिकांसोबत चर्चा करणार आहेत.