दोन दिवस निर्जळी
By Admin | Updated: March 1, 2016 23:48 IST2016-03-01T23:38:56+5:302016-03-01T23:48:17+5:30
हिंगोली : सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे सिद्धेश्वर व डिग्रस येथील पंपिंग यंत्रणेला वीजपुरवठा करणारी वाहिनी तुटल्याने जलकुंभात पाणीच आले नाही.

दोन दिवस निर्जळी
हिंगोली : सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे सिद्धेश्वर व डिग्रस येथील पंपिंग यंत्रणेला वीजपुरवठा करणारी वाहिनी तुटल्याने जलकुंभात पाणीच आले नाही.
वीजवाहिनीच्या दुरूस्तीसाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार असून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दोन दिवस निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन नगराध्यक्षा अनिता सूर्यतळ, उपनगराध्यक्ष जगजित खुराणा व मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)