शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांपूर्वी फौजदार झाला अन् लाच घेताना रंगेहाथ पकडला, तर दुसऱ्या फौजदाराने...

By राम शिनगारे | Updated: May 25, 2023 19:55 IST

कौटुंबिक वादाच्या गुन्ह्यात मदतीसाठी आरोपींकडून घेतले २४ हजार

छत्रपती संभाजीनगर : दोन दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाने राज्यातील ३८५ जणांना फौजदार केल्याचे आदेश मंगळवारी रात्री काढले. त्यात नाव असलेल्या सातारा ठाण्यातील पोलिस कर्मचारी मच्छिंद्र बापुराव ससाणे (५५, रा. ग.नं.२, हनुमानगर, दत्ताचौक, गारखेडा) यास २४ हजार रुपयांची लाच घेतना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी रंगेहाथ पकडले. बुधवारी दिवसभर पुष्पगुच्छ स्वाकारणाऱ्या ससाणेच्या हातात गुरुवारी बेड्या पडल्या आहेत.

सातारा पोलिस ठाण्यात कार्यरत मच्छिंद्र ससाणे याच्याकडे कौटुंबिक वादातुन दाखल ४९८ च्या गुन्ह्याचा तपास होता. या गुन्ह्यात आरोपींना मदत करण्यासाठी ससाणे याने २५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती २४ हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार एसीबीचे निरीक्षक संदीप राजुपत, अंमलदार केवलसिंग घुसिंगे, बाळासाहेब राठोड, दत्तात्रय होरकटे यांच्या पथकाने संताजी पोलिस चौकीजवळ सापळा लावला. तक्रारदाराकडून पैसे घेताना मच्छिंद्र ससाणे यास पथकाने रंगेहाथ पकडले. ज्या ठाण्यात बुधवारी दिवसभर पुष्पगुच स्विकारले, सर्वांनी अभिनंदन केले, त्याच ठाण्यात ससाणेच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनात केली.

अर्ज निकाली काढण्यासाठी मागितले २० हजारसिडको पोलिस ठाण्यातील फौजदार नितीन दशरथ मोरे (४७) याने पोलिस ठाण्यात प्रापर्टीविषयी दाखल तक्रार अर्जात गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि दाखल केल्यास आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची मागणी केली होती. तडाजोडीत १२ हजार रुपयात व्यवहार ठरला. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिस निरीक्षक हणुमंत वारे, अंमलदार साईनाथ तोडकर, राजेंद्र सिनकर, विलास चव्हाण यांच्या पथकाने सापळा लावला. सिडको ठाण्याच्या पाठीमागील साई रसवंतीमध्ये १२ हजार रुपये लाच घेताना पथकाने पकडले. विशेष म्हणजे मोरे हा सुद्धा चार महिन्यांपूर्वीच फौजदार झाला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग