फूड सायन्सवरील दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद
By | Updated: December 4, 2020 04:13 IST2020-12-04T04:13:14+5:302020-12-04T04:13:14+5:30
( जाहीरात बातमी ) औरंगाबाद : पैठण रस्त्यावरील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात ९ व १० ...

फूड सायन्सवरील दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद
( जाहीरात बातमी )
औरंगाबाद : पैठण रस्त्यावरील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात ९ व १० डिसेंबर रोजी ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषदचे आयोजन करण्यात आले आहे.
‘पदार्थ विज्ञान व तंत्रज्ञान आणि आरोग्य यासमोरील सध्याची आव्हाने’ या विषयावर देशभरातील नामांकित तज्ज्ञ परिषदेत ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत. सहभागी होण्यासाठी देश- विदेशातील १,५०० विद्यार्थी व विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, प्राध्यापक, पीएच.डी.धारकांनी नावनोंदणी केली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. स्वाती नाखले यांनी दिली. या ऑनलाइन परिषदेत नावनोंदणी करून सहभागी होण्याचे आवाहन, महाविद्यालयाचे संचालक शाहिद शेख यांनी केले आहे.