सिल्लोड तालुक्यातील जिनिंगचे दोन कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2016 00:21 IST2016-01-03T23:44:18+5:302016-01-04T00:21:53+5:30

सिल्लोड तालुक्यातील काही खाजगी जिनिंग मालक विना परवाना कापूस खरेदी करत आहेत, तर काही जिनिंग चालक शासनाचा कर थकवीत आहेत.

Two crore tired of Jining in Sylod taluka | सिल्लोड तालुक्यातील जिनिंगचे दोन कोटी थकले

सिल्लोड तालुक्यातील जिनिंगचे दोन कोटी थकले


सिल्लोड तालुक्यातील काही खाजगी जिनिंग मालक विना परवाना कापूस खरेदी करत आहेत, तर काही जिनिंग चालक शासनाचा कर थकवीत आहेत. राजकीय वरदहस्त व प्रशासनाची मूक संमती असल्याने तालुक्यातील ३२ खाजगी जिनिंग मालकांकडे महसूल विभागाचा १ कोटी ९१ लाख ६ हजार ५३५ रुपये अकृषिक कर थकला आहे.
या शिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीला ते कर देतच नाहीत. परराज्यातून आलेले काही कापसाचे व्यापारी सिल्लोडमध्ये येऊन मनमानी कशी करू शकतात हा प्रश्न उपस्थित झाला आहे़ या लोकांवर प्रशासन का कारवाई करीत नाही हे एक कोडेच आहे़
सिल्लोड तालुक्यातील ज्या खाजगी जिनिंगमध्ये कापूस खरेदी केला जातो, त्यांनी कापूस खरेदीचा कर सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीला भरणे आवश्यक आहे; मात्र यापैकी काही जिनिंग चालक कागदोपत्री कापूस खरेदी खाजगी बाजार समिती मोढा बुद्रुकच्या आवारात दाखवून सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचा कर बुडवत आहेत. महसूल विभागाचा अकृषिक कर, कृ. उ. बाजार समितीचा कर थकविणाऱ्या बड्या व्यापाऱ्यांवर आतापर्यंत कारवाई का झाली नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे़
सिल्लोड तालुक्यातील जिनिंगनिहाय थकलेला महसूल विभागाचा अकृषिक कर असा : गुरुकृपा जिनिंग ४ लाख ७७ हजार ७२६, जयलक्ष्मी जिनिंग ९,२७,११६, नवीन कोटेक्स ७,९६,४८०, किंजल जिनिंग ४,००३९०, खंडेलवाल जिनिंग ४,३३,६१२, अग्रवाल कोटेक्स ५,५६,९८७, सिल्लोड जिनिंग प्रेसिंग १२,१८,७२२, मुलचंद जिनिंग ४५३६१४, पुनीत इंटरप्राईझेस ८,०५,९०६, प्रदीप फायबर्स ११,५४,९२६, शिवम कॉटन जिनिंग ७,०८,५९८, गौरिशंकर कोटेक्स १०,७१,०६८, आॅईल प्रोजेक्ट मंजित आॅईल २,८५,०५७, राजराजेश्वर कॉटन जिनिंग ९,४७,२६७, हरिओम जिनिंग ७,९६,६७६, अन्वी सहकार जिनिंग प्रेसिंग ९,७१,५९२,जोशी कोटेक्स ५,३९,७२६, सिद्धेश्वर जिनिंग पे्रसिंग ५,७९,३४९, सहकार जिनिंग अजिंठा ४,१४,५१२, साठे जिनिंग अजिंठा ३,९१,४१९, सहकार जिनिंग भराडी ५,२६,२४०, राधा सर्वेश्वर जिनिंग डोंगरगाव ४,९८,७१४, बागवान कोटजिन ३,०१,६३४, सचिन फायबर्स ४,७३,७६६, शिवम फायबर्स ८,६५,३५७, रोकडोबा महाराज जिनिंग लिहाखेडी ४,३८,८०३, ऋषी फायबर्स १०,८१,५६८, मराठवाडा अ‍ॅग्रिकल्चर भराडी - सिल्लोड ४,७५६, शिंदे जिनिंग सावखेडा ९,८४,९५५ असे एकूण १ कोटी ९१ लाख ६ हजार ५३५ रुपये आहे.

Web Title: Two crore tired of Jining in Sylod taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.