दोन बालकांना डेंग्यूची लागण

By Admin | Updated: September 26, 2014 00:37 IST2014-09-26T00:35:01+5:302014-09-26T00:37:28+5:30

वसमत : शहरासह तालुक्यात डेंग्युच्या रुग्णांची संख्या वाढत असताना दोन बालके डेंग्यु पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे.

Two children infected with dengue | दोन बालकांना डेंग्यूची लागण

दोन बालकांना डेंग्यूची लागण

वसमत : शहरासह तालुक्यात डेंग्युच्या रुग्णांची संख्या वाढत असताना दोन बालके डेंग्यु पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. खबरदारी म्हणून त्या दोघांना नांदेड येथे हलविण्यात आल्याचे वृत्त आहे.
वसमत येथील डॉ. निलेश डिग्रसे यांच्या दवाखान्यात दाखल असलेल्या दोन बालकांना डेंग्यूची लागण झाली आहे. तालुक्यात सध्या ताप- खोकल्याची साथ आल्यासारखी परिस्थिती आहे. यात तापीच्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. ताप वाढली की डेंग्यू झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेतून मिळतो. त्यानंतर रुग्णांना नांदेड, औरंगाबाद, अकोला आदी शहरांमधील दवाखान्यात हलवावे लागत आहे. आरोग्यविभागाकडे मात्र डेंग्यू किंवा तापीची साथ असल्याबाबतची कोणतीही माहिती नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार मिळत नाहीत. त्यामुळे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना साथीची खबर नसते. रक्त नमुने घेण्याचे काम ठप्प आहे. परिणामी साथ नसल्याची कागदोपत्री अहवाल तयार होत आहे. वर्तमानपत्रात डेंग्यूच्या बातम्या आल्याकी वरिष्ठांना अहवाल सादर करण्यापुरते सर्वेक्षणाचे काम होते. पुन्हा पहिल्यासारखी परिस्थिती राहते, अशीच अवस्था आहे. (वार्ताहर)

Web Title: Two children infected with dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.