डोळ्याच्या पापणीने उचलल्या दोन खुर्च्या
By Admin | Updated: June 24, 2014 00:38 IST2014-06-24T00:38:36+5:302014-06-24T00:38:36+5:30
बाळू बुद्धे , हरंगुळ (बु.) लातूर तालुक्यातील हरंगुळ (बु.) येथे अब्दुल सय्यद या युवकाने हरंगुळ (बु.) येथे चित्तथरारक कसरती करून त्यातून मिळालेल्या पैशातून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह सुरू केला आहे.

डोळ्याच्या पापणीने उचलल्या दोन खुर्च्या
बाळू बुद्धे , हरंगुळ (बु.)
लातूर तालुक्यातील हरंगुळ (बु.) येथे जालना जिल्ह्यातील खनापराडा येथील अब्दुल सय्यद या युवकाने हरंगुळ (बु.) येथे चित्तथरारक कसरती करून त्यातून मिळालेल्या पैशातून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह सुरू केला आहे.
मानवी जीवनात प्रत्येकाला काही ना काही कामकाज करून आपला व आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करावा लागतो. त्याच धर्तीवर जालना जिल्ह्यातील खनापराडा येथील अब्दुल सय्यद या युवकाने ५० किलो वजनाचा दगड दोरीने बांधून पाठीमागे फेकणे, डोळ्याच्या पापणीने दोरीच्या सहाय्याने दोन खुर्च्या उचलणे, त्या चौफेर फिरविणे तसेच दोन सायकली केसाला बांधून फिरविणे असे विविध चित्तथरारक प्रयोग सादर करून उपस्थित नागरिकांना मंत्रमुग्ध केले.
अशा जिवावर बेतणाऱ्या कसरती सादर करून मिळालेल्या अल्पश: पैशातून आपला व कुटुंबियाचा उदरनिर्वाह सुरू ठेवला असल्याचे अब्दुल सय्यद याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.