शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप
2
बिल्डरचा प्रतापी बाळ कचाट्यात सापडणार; आज पुन्हा सुनावणी, पोलिसांनी मोठी तयारी केली
3
कपिल सिब्बलांच्या चुकीचा फटका? हेमंत सोरेन यांना धक्का; सुप्रीम कोर्टातील जामीन याचिका मागे!
4
...म्हणून तरी भारत-पाकिस्तानच्या सरकारने एकी दाखवावी; माजी खेळाडूचं रोखठोक मत
5
"आजच्या भारतात आडनावाला नाही तर, मेहनतीला महत्त्व," PM मोदींनी केलं Zomatoच्या मालकाचं कौतुक
6
"तिच्या मृत्यूनं आमचीही स्वप्न तुटली..."; पुणे अपघातातील मृत मुलीच्या बापाचा आक्रोश
7
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
8
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
9
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
10
"मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप
11
राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा
12
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
13
"जान्हवी हे नाव म्हणजे ...", 'लेकी'च्या वाढदिवशी विश्वास नागरे पाटलांची खास पोस्ट
14
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
15
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
16
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
17
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
18
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
19
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
20
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना

एसआरपी भरतीत बनवाबनवी करणाऱ्या दोन उमेदवारांचा भंडाफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 5:43 PM

सातारा परिसरातील भारत बटालियन येथे सुरू असलेल्या भरती प्रक्रिये दरम्यान बनवाबनवी करणाऱ्या दोन उमेदवारांचा चाणाक्ष अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला.

औरंगाबाद: सातारा परिसरातील भारत बटालियन येथे सुरू असलेल्या भरती प्रक्रिये दरम्यान बनवाबनवी करणाऱ्या दोन उमेदवारांचा चाणाक्ष अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला.  भरती प्रक्रियेचे चित्रण करणाऱ्या व्हिडिओ  कॅमेऱ्यातही आरोपींची बनवा-बनवी  कैद झाली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात दोन्ही उमेदवारांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

रमेश शांताराम दांडगे(चेस क्रमांक २८६३,रा. रा. दहिगाव, ता.सिल्लोड) आणि अमोल लुकड वाणी(चेस क्रमांक २८६५,रा. दहिगाव, ता. कन्नड)अशी आरोपी उमेदवारांची नावे आहेत. सातारा पोलिसांनी सांगितले की, सातारा परिसरातील भारत बटालियन या राज्य राखीव दलातील रिक्त पदासाठी पंधरा दिवसापासून भरती प्रक्रिया सुरू आहे. १७ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ६ दरम्यान सहायक समादेश मोहमंद इलियास मोहमंद सईद(५४)हे उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली. या मैदानी चाचणी दरम्यान उमेदवार रमेश दांडगे आणि अमोल वाणी यांच्यासह अन्य उमेदवारांची धावण्याचे प्रात्यक्षिक घेतले. यावेळी रमेश आणि अमोल यांनी संगणमत करून बनवाबनवी केल्याचे निदर्शनास आले. यावेळी रमेशने पळण्याचे टोकन घेतल्यानंतर तो अडिच किलोमिटर पळाला आणि त्याने त्याचे टोकन आरोपी अमोल लुकड याला देऊन त्याला पुढील अंतर पळायला सांगितले. त्यानुसार अमोल हा रमेशच्यावतीने अडिच किलोमिटर अंतर पळून त्याने रमेशला गुण मिळवून दिले.

हा प्रकार मात्र त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आला नाही. मात्र त्यादिवशी आरोपीसोबत धावणाऱ्या अन्य उमेदवारांना हा प्रकार माहित असल्याने त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. त्यानंतर भरती प्रक्रियेतील भरती अधिकाऱ्यांनी त्या दिवशी केलेले व्हिडिओ चित्रण तपासले. या चित्रणामध्ये आरोपींची बनवा-बनवी त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ही बाब आरोपींना   कार्यालयात बोलावून   त्यांच्याविरोधात शुक्रवारी सातारा ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.

टॅग्स :PoliceपोलिसSatara areaसातारा परिसरexamपरीक्षाAurangabadऔरंगाबाद