एकाच रात्री दोन घरफोड्या
By Admin | Updated: May 7, 2014 00:46 IST2014-05-07T00:46:14+5:302014-05-07T00:46:30+5:30
नांदेड : भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री दोन घर फोडल्याची घटना ५ मे रोजी सकाळी उघडकीस आली़

एकाच रात्री दोन घरफोड्या
नांदेड : भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री दोन घर फोडल्याची घटना ५ मे रोजी सकाळी उघडकीस आली़ दोन घटनांत चोरट्यांनी जवळपास लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला़ शहरातील त्रिवेणीनगरातील रहिवासी शेख मुकरम शेख नजीर हे घराला कुलूप लावून कुटुंबीयासह ४ मे रोजी बाहेरगावी गेले होते़ दरम्यान, रात्रीच्यावेळी चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला़ कपाटात ठेवलेले सोने-चांदीचे दागिने व रोख दहा हजार रुपये असा एकूण ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला़ दुसरी घटना ज्ञानेश्वरनगर भागात घडली़ मुरलीधर राजेश्वर कुलकर्णी हे देवकार्यासाठी बाहेरगावी गेले होते़ चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील दागिने व रोख ५ हजार रुपये असा एकूण ५८ हजार रुपयांचा ऐवज पळविला़ एकाच रात्री दोन घरांना लक्ष करत चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले़ दोन्ही घटनेची नोंद भाग्यनगर ठाण्यात झाली असून तपास पोहेकॉ़ केंद्रे हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)